पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ४ था.

४१

१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)

करणारा देखावा पहावयास मिळत असे; परंतु आमच्या दुर्भाग्याने दिवसानु- दिवस तो संपुष्टांत येत चालला आहे ! असो. या सुटीच्या कालांत चिनी राष्ट्रांतील प्रत्येक शहरांतील व खेड्यांतील लोकांचीं संमेलने होऊन त्यांनां एकमेकांचीं मनें रिझविण्याची संधि मिळते. आणि त्या कारणानें परस्परांची परस्परांस विशेष माहिती होऊन राष्ट्रीय ऐक्यसंवर्धनास मदत होते.

 नियतकालिक मेजवान्यांचा मागें जो प्रकार सांगितला तो सणावाराचे दिवशीं अगर कांहीं नैमित्तिक कारणानें जुळून येत असतो. ह्या प्रसंगी स्नेही, आप्तइष्ट व इतर कांहीं विशिष्ट पाहुणे येवढ्यांनांच निमंत्रण करण्यांत येते. त्यांत कांहीं स्त्रियाही असूं शकतात. ही मेजवानी कांही अंशीं युरोपियन मेजवानीच्या धर्तीवर होत असते. मेजवानीच्या प्रसंगीं करमणुकीकरितां गायन व वादनद्दी कोठें कोठें सुरू असतें.

 वनभोजन व क्षेत्रभोजन हे प्रकारही चीन देशांत आहेत. वनभोज नाचा प्रकार आमचेकडे आहेच व त्याबद्दल विशेष लिहिण्याचें कांहीं कारण नाहीं, परंतु क्षेत्रभोजनासंबंधानें थोडा खुलासा करणे जरूर आहे. क्षेत्र- भोजनाचा प्रकार असा आहे कीं, एखादें गांव, देवालय, पर्वत, अरण्य, मुद्दा वगैरे कोणतें तरी एखादें स्थान पाहण्यास जाण्याचा एखाद्या शहरांतील अगर गांवांतील कांही लोकांनीं विचार केला ह्मणजे ते त्या कार्याप्रीत्यर्थ वर्गणी जमवितात. जितके लोक वर्गणी देतील त्या सर्वाचा एक कंपू बनतो. आणि मग ठराविक दिवशीं हे सर्व लोक त्या ठिकाणी जातात. तेथे गेल्यावर एक अगर दोन दिवस राहून, तेथील स्थान पाद्दर्णे, पोहणे, अन्य तऱ्हेची क्रीडा करणे व सहभोजन इत्यादि गोष्टी ते तेथें करितात. हा योग जुळवून आणण्याकरितां ठिकठिकाणी मुद्दाम कांहीं विशिष्ट संस्था ( Societies) स्थापन झालेल्या आहेत. क्षेत्रभोजनाचा हा खरा प्रकार झाला. याप्रमाणेच उदुपटीचा खोटाही एक प्रकार आहे. त्यांत वर्गणी जमविणें व जेवण करणें ह्या दोन गोष्टी मात्र खन्या असतात. क्षेत्रप्रयाणाचा वेत मात्र गाळलेला असतो. हॅ जेवण एखाद्याच्या घरीं अगर एखाद्या मोठ्या बगिच्यांत करितात.


 १ येथे ' क्षेत्र' हा शब्द सामान्यतः ' स्थान ' ह्या अर्थाने योजला आहे.