पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ३रा.

२९

१५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा) १५:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)

परस्परांच्या दरबारी जाऊं येऊ लागले. या राजघराण्याने कोरिया प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला होता व त्याने सयाम देशापर्यंत आपले वकील पाठविले होते. यांच्याच कारकीर्दीत बुद्धधर्माचा चीनमध्ये विशेष फैलाव झाला. या अमदानींतच ( इ० स० ३९९ ) फशैन नामक बुद्ध धर्मोपाध्याय मध्यचीनांतून निघून हिंदुकुश पर्वताच्या रस्त्याने हिंदुस्थानांत आला व तेथून सिलोन, सुमात्रा वगैरे ठिकाणी गेला. पाटणा, बनारस व बुद्धगया इत्यादि हिंदुस्थानांतील क्षेत्रांचे वर्णन त्याच्या प्रवासवृत्तांत आहे. त्यावरून तो या ठिकाणी काही दिवस राहिला असावा असे दिसतें. सिलोनमध्ये तर तो तीन वर्षे होता. सुमारे १५ वर्षांनी तो परत आपल्या देशास गेला.

 इ० स० ६१८ च्या सुमारास चीनची राजसत्ता टंग नामक राजघराकडे आली. या घराण्याने ३०० वर्षेपर्यंत राज्य केले. या घराण्यांतील राजपुरुषांच्या कारकीर्दीत चीन देशाची पुष्कळ भरभराट होऊन त्यास सुखशांततेचा लाभ झाला. यांचे कारकीर्दीत सर्वत्र एकछत्री अंमल सुरू होऊन जनतेमध्येही एकराष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने ऐक्य झाले. या राजघराण्याचे नांव दक्षिण चीनमध्ये अद्यापही अभिमानपूर्वक निघत असतें. हन राजघराण्याचे अंमदानीत ज्याप्रमाणे लु नामक स्त्री राज्यकर्ती होऊन गेली त्याचप्रमाणे ह्या घराण्यांतही तू नामक राज्यकर्ती होऊन गेली. हिने आपल्या सवतीच्या मुलाची गादी बळकावली होती. हिच्या अंगी लु पेक्षा अधिक कर्तृत्व व अधिक बुद्धिमत्ता होती. तिने अगदीं करडा अंमल गाजविला. वृद्धापकाल झाल्यावर मात्र तिचे सामर्थ्य शिथिल झाले आणि मग तिच्या मंत्र्यांनी तिला गादीवरून काढून टाकून योग्य वारसास गादीवर बसविलें. तरूणपणी तिने कोणाचीही मात्रा चालू दिली नाही. तिचा नवरा मेल्यावर ती भरदरबारांत पुरुषासारखी कृत्रीम दाढीमिशा लावून बसत असे. इ. स. ६९४ त तिने स्वतः · देवी' हा किताब धारण केला. आणि उत्तरोत्तर तिची वागणूक फार उर्मटपणाची होऊ लागली. अर्थात् त्यामुळे ती भोवतालच्या लोकांस अप्रिय होऊ लागली. हिने स्त्री व पुरुष यांस समान लेखण्याचा क्रम सुरू केला. हिने स्त्रियांनां सार्वजनिक ऊर्फ सरकारी नोक-यांकरितां परिक्षेस बसण्याची परवानगी दिली आणि परिक्षेत पसार होणा-यांस नोकन्या दिल्या. कोर्टामध्ये साक्षीपुरावा देतांना गुडघे टेकण्याची तिकडे रीत आहे. त्या बाबतीत स्त्रियांनां हिने माफी दिली होती. स्त्रियांनां पुरुषांच्या बरोबरीने वागविण्याचा