पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०८, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

आपल्या गांवची स्वच्छता राखीत असत. गांवाच्या बंदोबस्ताकरितां प्रत्येक गांवाचे बॉर्ड ( भाग ) केलेले असत व त्या त्या भागाच्या निरनिराळ्या वेशी असून त्या प्रत्येकीवर रात्रीं एकेक पहारेकरी असे. अपरात्रपर्यंत घराबाहेर राहण्याची व कंदिलावांचून रात्री बाहेर पडण्याची मनाई असे.

 चिनो परगण्यांतील कोणत्याही गांवांतून जर कोणी माणूस जात असला आणि त्यास गुप्तपणें एखाद्याने दगड मारला तर त्याबद्दलची तक्रार त्याने योग्य अधिका-याकडे नेतांच, ज्या हद्दींत त्याजवर दगड मारला गेला असेल त्या द्दष्ट्द्दींतील ग्रामाधिका-यांस बोलावून आणून दंड करण्यांत येतो. यामुळे अशा प्रकारची वर्तणूक आपल्या हद्दीत कोणी करूं नये ह्मणून ग्रामाधिकारी फार दक्ष रहातात. याचप्रमाणे मुलांच्या अपराधाबद्दल त्यांच्या आईबापांस व नोकरांच्या अपराधाबद्दल त्यांच्या मालकांस जबाबदार धरण्यांत येते. याप्रमाणे चीन देशांतील कायद्यांचे व राज्यव्यवस्थेचे सामान्य धोरण आहे. आतां, त्या देशांत आजपर्यंत जीं प्रख्यात राजघराणी व राज्यकर्ते होऊन गेले त्यांची थोडीशी माहिती देऊन हा लेख पुरा करूं.

 चीनमध्ये बादशाही सत्ता कधी व कशी स्थापन झाली आणि त्यानंतर लवकरच ती प्रसिद्ध अशा हन घराण्याकडे कशी गेली यासंबंधींची माहिती पहिल्या लेखांकांत आलीच आहे. या हन घराण्याचा शेवट इ० स० २२० च्या सुमारास झाला. बेबंदशाही, रंगेलपणा, कपटकारस्थान इत्यादि कारणां- मुळे देशांत अस्वस्थता माजून एक मोठे बंड झाले व त्या बंडांत हन राज- घराण्याचा विध्वंस होऊन चीन देशांत ३ निरनिराळीं राज्य स्थापन झाली. हे तिन्ही राजे नेहमीं आपापसांत लढत असत. त्यांच्या ह्या युद्धांची हकीकत कादंबरीरूपाने चिनी ग्रंथकारांनी लिहून ठेवलेली आहे. ही तीन राज्ये इ. स. २६५ पर्यंत टिकली. नंतर चिन् नामक राजघराण्यानें त्या सर्वांस जिंकून एकछत्री अंमल सुरू केला. ह्या राजघराण्याच्या अमदानीत तार्तर लोकांनीं उत्तर चीनवर सतत हल्ले करून त्यांस जेरीस आणलें. तार्तर लोकांचा पराभव पुढे टोबा नामक राजघराण्यांतील पुरुषानें केला व तेव्हांपासून उत्तरचिनांत ह्या घराण्याचे वर्चस्व माजले. ह्या राजघराण्यानें उत्तरचीनवर सुमारे २०० वर्षे राज्य केलें व त्या काळांत दक्षिण चीनमध्ये लहान लहान स्वदेशी संस्थानें होती. टोबा राजघराणें हें मांगोलियन जातीचें होतें असें दिसतें. यांच्या अमदानीत जपान चीनला खंडणी देऊं लागलें व ह्या दोन्ही राष्ट्रांचे वकील