पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:१४, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

तिचा हा प्रयत्न ती गादीवरून दूर होतांच शिथिल पडला व पुढे त्यास कोणी फारसें उचलून धरलें नाहीं. ह्या राणीनंतर ह्या घराण्यांत झालेली प्रख्यात व्यक्ति मिंग-हंग ही होय. हा बादशहा मोठा शूर, धाडसी, विलासप्रिय व वाङ्मय आणि विद्या यांचा भोक्ता होता. तो० इ० स० ७१२ मध्ये गादीवर बसला. याचे कारकीर्दीत गांवोगांव शाळा स्थापन करण्यांत आल्या. स्त्री व पुरुष या दोघांनाही वादनकला शिकविण्याकरितां त्याने एक मोठे विद्यालय स्थापन केलें होतें. त्याची युद्धप्रियता व फाजील खर्च करण्याची प्रवृत्ति यांमुळे जनतेवर करांचा बोजा फार वाढला. त्या कारणाने लोकांत असंतोष माजून पुढे लवकरच मोठे बंड झालें. त्याच्या दरवारों अनेक विद्वान व कलाभिज्ञ लोक असत. त्यानें एक अंगवस्त्र बाळगलें होतें. तिचें नांव कायफे अ होतें. तिच्या नादांत असतां यानें कित्येक हिजड्यांनां मोठ्या अधिकारावर नेमलें होतें. याच्या कारकीर्दीत स्त्रियांनी बुरखे घेण्याचें सोडून दिलें होतें. धर्मभोळेपणा, स्वैर।चार इत्यादि गोष्टींस याच्या कारकीर्दीच्या अखेरीस उत्तेजन मिळत गेलें. या सर्वांचा परिणाम लोकक्षोभ व बंड यांत झाला (इ. स. ७५५) तेव्हां हा बादशहा पळून जाऊं लागला; त्या वेळी त्याच्या शिपायांनी बंड करून त्याच्या घराण्यांतील कित्येक अयोग्य माणसे मोठ्या जागेवर होतीं तीं आपल्या ताब्यांत घेण्याचा आग्रह त्यानी घरला; तसेंच त्यानीं बादशहाच्या उपरोक्त अंगवस्त्रास बादशहाकडून जबरीनें देहांत शासन करविलें. तिचा वध झाल्यानंतर त्यानीं तिच्या कुटुंबाचीही वाताहात करून टाकली. पुढें त्यांचा व लोकांचा क्षोभ शांत करण्याकरितां सदर बादशहानें आपण राज्यका- रभारांतून मन काढून आपल्या मुलास गादीवर बसविलें. ह्या उत्पातासंबंधीं एक मोठें सुंदर काव्य भावी कालांतील एका कवीनें केलेले आहे व तें फार लोकप्रिय झालेलें आहे. या बादशहाच्या मृत्युनंतर पुढे लवकरच ह्या घरा- ण्याचा नाश झाला. त्यानंतर सुमारें पांच निरनिराळ्या राजघराण्यांनीं चीनवर बादशाही सत्ता गाजविली. पण त्यांच्यांत विशेष नांव घेण्यासारखा कोणी पुरुष निपजला नाहीं. ह्या ५ घराण्यांनी मिळून सुमारे ५० वर्षे राज्य केलें. नंतर सुंग नामक राजघराण्याचे हातीं तेथील राजसूत्रे आली. हॅू राज- घराणे सुमारे ३०० वर्षेपर्यंत टिकले. याच्या कारकीर्दीत चीन देशाची अनेक बाजूंनीं प्रगति होत गेली. या वेळेस झालेली सुधारणा अद्याप चालत आलेली आहे. या ३०० वर्षाच्या काळांत चीन