पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक २ रा

१७

१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४४, ६ डिसेंबर २०२३ (IST)

लोकांनी मँगोल्स लोकांपासून इ०स० च्या १३ व्या शतकांत उसनी घेतलेली आहे. तत्पूर्वी लहान लहान गोष्टी लिहिण्याची पद्धत मात्र चिनी लोकांत होती. तथापि गोष्टी किंवा कादंबऱ्या लिहिणें हें हलक्या दर्जाचे काम आहे अशी चिनी विद्वानांची समजूत असल्यामुळे कादंबरीलेखकांत नामांकित बुद्धि- वान् कोणी आढळून येत नाहीं. मग प्रतिभासंपन्न कादंबरीकार कोठून निपज- णार ? अशा स्थितीमुळे चिनी कादंबऱ्या अगदी सामान्य प्रतीच्या आहेत. त्यांतल्या त्यांत कांहीं बऱ्या आहेत; पण कांहीं फारच अश्लील व ग्राम्य अशा आहेत. चांगले लोक बहुधा त्या हाती सुद्धां घरीत नाहीत. ह्या कादंबऱ्यांची भाषापद्धति अगदीं विस्कळित व सुलभ अशी असते. वरिष्ट प्रकारच्या वाङ्- मयाची भाषा कसलेली कमावलेली व तोलून शब्दयोजना केलेली अशी असते.

 चिनी कविताही अत्यंत शुद्ध व उदात्त अशी आहे. त्यांत ग्राम्यतेचा लेशही आढळून यावयाचा नाहीं. सृष्टिसौंदर्य, धर्म, तत्वज्ञान, नीति हे त्या कवितेचे मुख्य विषय आहेत. कवितेचा संग्रह फार दांडगा आहे.

 चीन देशामध्ये वैद्यकीय विषयांच्या ग्रंथांचाही बराच मोठा संग्रह आहे. शारीरशास्त्र व छेदनकला यांचे त्या लोकांस प्राचीन काळी फारसें ज्ञान नव्हते; परंतु रोगोत्पत्ती व त्यांचे निवारण करणान्या वनस्पति यांचे शास्त्र मात्र त्यांस चांगलें अवगत असे. चिनी लोक शरिरावर शस्त्रक्रिया करून घेण्यास फारसे खुष नसतात. शरीर जसें ( निर्माण झालें ) आलें तसेंच तें भावी लोकांत गेलें पाहिजे अशी त्यांची भोळी समजूत आहे. प्राचीन काळी चिनी लोकांत अत्यंत नामांकित असे चार पांच वैद्य होऊन गेले आहेत. त्यांच्या योग्यतेचा विचार करितां त्यास 'धन्वंतरी' ही पदवी सहज लागू पडेल यांत शंका नाहीं. यांपैकी एक दोन वैद्य शस्त्रकलेतही निष्णात होते असें दिसतें. इ० स० च्या दुसऱ्या शतकांतील एका वैद्याने एका लष्करी अधिकान्यास 'भूल' देऊन त्याच्या मस्तकावर शस्त्रप्रयोग केल्याचा दाखला सांपडतो. यावरून 'भूल' देण्याची कल्पना ही पाश्चात्य वैद्यकांत तिचा उदय होण्यापूर्वीच चीन देशांत अस्तित्वांत होती, हें निर्विवाद ठरत आहे.

 चीन देशांत तत्वज्ञानविषयक वाङ्गमयही पुष्कळ आहे. तेथे जे अनेक तत्ववेत्ते झाले त्या सर्वाच्या मतांचे व ग्रंथांचे निरीक्षण करूं गेल्यास एक मोठा थोरला ग्रंथच होईल. त्यांपैकीं कांहीं प्रमुख तत्ववेत्यांच्या मतांचं नुसतें दिग्दर्शनच ह्या लहानशा लेखांत करितां येणार आहे. सर्व चिनी तत्व- नेत्यांत कन्फ्युशियस हा अग्रणी आहे. ह्याचें नैतिक तत्वज्ञान फार उच्च