पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४६, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

दर्जाचे असून त्याचा तेथील समाजावर विशेष पगडा बसलेला आहे. मनुष्य द्दा स्वभावतः सद्गुणी प्राणी असून भोवतालच्या परिस्थितीचे अनिष्ट संस्कार त्याजवर घडल्यामुळेच तो वाईट- दुर्गुणी बनतो; ह्मणजे परिस्थिति त्याच्या- मध्यें वाईट प्रकारचे संस्कार उत्पन्न करिते,' असे कन्फ्युशियस याचें मुख्य मत आहे. हा निसर्गसिद्ध नियम आहे असें तो ह्मणतो. हें मत त्याच्यामागून झालेल्या मेनिशियस नामक प्रख्यात तत्ववेत्यासही मान्य आहे. परंतु त्याच्या समकालीन असलेल्या काऊ, नामक दुसन्या एका थोर तत्ववेत्त्यास तें मान्य नाहीं. काऊचे हाणणें असें आहे कीं, 'लांकूड, दगड इत्यादि प्रथम ओवडधोबड स्थितीत असलेल्या पदार्थांपासून ज्याप्रमाणे परि- श्रमानें व कारागिरीनें निरनिराळ्या सुंदर उपयुक्त वस्तु बनवितात, तसेंच मनुष्याच्या अंगींद्दी सद्गुणांचे वास्तव्य होण्यास परिश्रमपूर्वक त्यांची कमाई करावी लागते. मनुष्य हा स्वभावतः चांगलाही नाहीं व वाईटही नाहीं. लांकडाच्या ठोकळ्याप्रमाणे जन्मतः तो संस्कारहीन असाच असतो. त्याजवर पुढे चांगले संस्कार घडवून आणले तर तो चांगला होतो व वाईट संस्कार घडवून आणल्यास अर्थातच वाईट होतो. ही संस्कारक्रिया अंशतः स्वतःच्या प्रयत्नानें व अंशतः परिस्थितीप्रमाणे घडून येत असते.

 काऊ व मेनिशियस ह्या दोघांनीं परस्परांचीं मतें खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे व यासंबंधांतला त्या दोघांचाही बुद्धिवाद तत्वजिज्ञासूंस क्षणभर तरी तल्लीन केल्यावांचून सोडणार नाहीं असा आहे. त्यापैकी थोडासा मासला येथे देतो.

 काऊ ह्मणतो कीं, ' मनुष्याचा स्वभाव हा पाण्याप्रमाणे आहे. पाणी ज्याप्रमाणें पूर्वेकडे नेल्यास पूर्वेकडे जाते व पश्चिमेकडे नेल्यास पश्चिमेकडेही जातें; त्याचप्रमाणें मनुष्यस्वभावास चांगले वळण लागल्यास तो चांगला बनतो व वाईट वळण लागल्यास वाईट बनतो. त्याचा ओढा निसर्गतः चांगल्याकडे. ही नाहीं व वाईटाकडेही नाहीं.' यावर ननिशियस असें उत्तर देतो कीं,पाणी हें पूर्वेप्रमाणेच पश्चिमेकडेही वाहूं शकते हें खरें; पण तें जसें स्वभावतः वरून खाली येत असतें, तसें तें खालून वर स्वाभाविकपणे जाईल काय ? उंच जागेवरून खालीं पडणें-वाहणें हा जसा पाण्याचा स्वाभाविक धर्म गणला जातो तसा खालून वर पाणी जाणें गणिला जातो काय ? खालून पाणी वर नेलें जातें; पण तें कार्य जबरदस्तीनें झणजे त्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा भंग करून केलेलें असतें. याच न्यायाने चांगुलपणा हा मनुष्याचा स्वाभाविक धर्म