पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४३, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

जो कोणी विद्वान असेल त्याला एखादी तरी कुशल चित्रकला, गायन, वादन वगैरे कला येत असावयाचीच असा साधारण नियम आहे. चिनी लोक काव्यभोक्ते आहेत व काव्य करणें हा एक त्यांच्या अंगचा सहज गुण आहे. छापण्याची व लिहिण्याची कला ख्रिस्ती शकापूर्वी १०४३ वर्षापासून चीन- मध्ये अस्तित्वांत आहे. उपरोक्त सालांत काळ्या मातीचे खिळे ( अक्षरांचे ) तेथे तयार करण्यांत आले. त्यानंतर कांही शतकांनी लांकडाचे खिळे झाले व नंतर तांब्याचे व शिशाचे झाले. तथापि खिळ्यांपेक्षां शिळाछापाचे काम तिकडे विशेष लोकप्रिय झाले व गतकालीन अनेक मोठमोठी पुस्तकें ह्या पद्धतीनें छापण्यांत आली आहेत. अलीकडे मात्र खिळ्या छापाचा प्रसार वाढत चालला आहे. परदेशी ग्रंथांतील आधुनिक भाषांतरें ह्याच पद्धतीनें छापली आहेत. चिनी लोक हे अतिशय वाचनप्रिय आहेत. यामुळे त्यांचें वाङ्मयही फार विस्तृत आहे. पेकींग गॅझट या नावाचें वर्तमानपत्र तेथें फार पुरातन काला- पासून चालू आहे. सर्व जगांत याच्या इतकें जुनें पत्र नाहीं. हें पत्र सरकारी असून त्यांत दरवारच्या हालचाली, अधिकान्यांची बहाली, बढती व दरबारचे निवडक वटहुकूम छापले जातात. पत्र रोज प्रसिद्ध होत असतें. प्राचीन- काली हे हातानें लिहून प्रसिद्ध करण्यांत येत असे. परंतु इ० स० १५ व्या शतकापासून तें छापून प्रसिद्ध करण्यांत येऊं लागले.चीनदेशाची संक्षिप्त माहिती

 चीनमध्ये उच्च प्रकारचें वाङ्मय पुष्कळ आहे. इतिहास, चरित्रें, तत्व- ज्ञान, काव्य, निबंध व इतर शाखा यांत भरपूर ग्रंथसंग्रह आहे. ह्या सर्व प्रकारच्या ग्रंथांतील भाषा फार शुद्ध ( Chaste ) व भारदस्त अशी आहे. त्यांत चुकून सुद्धां ग्राम्य वाक्य अगर शब्द सांपडणार नाहीं. प्राचीनकाळीं चीनमध्ये स्त्रीशिक्षणाचा फारसा प्रचार नव्हता; तथापि कित्येक बुद्धिमान् स्त्रिया विद्वान होत असत. त्यांपैकीं कांहीं ग्रंथकारही होत. ह्या स्त्रियांच्या ग्रंथांतील भाषाही अशीच शुद्ध, सरस व प्रौढ अशी आहे. वर निर्दिष्ट केलेल्या ज्या वाङ्मयाच्या शाखा आहेत त्यांचीच चिनी लोक ' सारस्वतांत गणना करितात. कादंबन्या, नाटके, गोष्टी वगैरे प्रकारच्या वाङ्मयास तेथील विद्वन्मंडळांत फारसा मान नाहीं. तथापी अशा तऱ्हेचें वाङ्मयही तिकडे कमी नाहीं. ऐतिहासिक व धार्मिक तऱ्हेच्या शेंकडों कादंब-या त्या वाङ्मयांत आहेत व सामान्य जनतेस त्या प्रियही आहेत. ह्या दुय्यम प्रतीच्या वाङ्मयांत मात्र श्रृंगारातिरेके, प्राम्यता नगैरे दोष आहेत. कादंबरी लिहिण्याची कल्पना चिनी