पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१५, ६ डिसेंबर २०२३ (IST)

लहान तट सध्यां पडलेले दिसत आहेत. हे सर्व तट परशत्रूपासून संरक्षण करण्याकरितां बांधले होते.

 चिनी साम्राज्याच्या कोणत्याही भागांत तेथील लोकांस आपल्या इच्छेनुरूप प्रवास करण्याची मुभा आहे. एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाण्यास परवाना वगैरे कांहीएक लागत नाहीं. परंतु चिनी लोक प्रवासाचे फारसे भोक्ते नाहींत. त्यांना आपले घरदार सोडून बाहेर जाववत नाहीं. शिवाय प्रवासाचीं साधनेंही असावी तितकीं सुलभ नसल्यामुळे प्रवास करणे फार गैर- सोईचे व दगदगीचे होते, द्देही प्रवासाविषयी तेथील लोकांत औदासिन्य असण्याचें कारण आहे. रस्त्यांत चोरांची वगैरे भीति फार असते. तथापि अशा स्थितीतही कांहीं ठळक ठळक लोक सृष्टिसौंदर्याची व ऐतिहासिक महत्वाची स्थाने पहाण्याकरितां वारंवार प्रवास करितात. चिनी अधिकारी तर आपा- पल्या प्रांतांतून नित्य प्रवास करीत असतात.

 चिनी संस्कृती ख्रिस्ती शकापूर्वी १० शतकांची जुनी आहे. त्यापूर्वीच चीनमध्ये सुवर्णयुग (Golden Age) होऊन गेलें अशी दंतकथा आहे. त्या वेळीं चीनमध्ये लहान, लहान संस्थाने असून त्यांचे लष्करी अधिपति हेच तेथील राजे होते. ह्या सर्वांत जे एक वरिष्ठ संस्थान होतें त्याच्या अधिपतीस राजा ही संज्ञा प्राप्त होऊन त्याच्या घराण्यास राजघराणे' ही संज्ञा प्राप्त झाली. ह्या संस्थानांमध्ये वारंवार आपसांत भांडणे व युद्धे होत असत व त्या वेळी युद्धनीति, राजनीति, सामाजिक नीति वगैरे सर्व प्रकार तेथे अस्तित्वांत होते. रोगनिवारणकलाही त्या वेळीं अस्तित्वांत होती. त्या वेळच्या लोकांची घरें मातीचीं व वर गवत घातलेली अशी होती. घरांतील जमिनीवर गालिच्यांऐवजी गवत हांतरलेलें असे. त्यानंतर चटया व मग पुढे लवकरच खुर्च्या, टेबलें वगैरे पदार्थ अस्तित्वांत आले. त्यांचे पोषाखही चांगले- रेशमाचे-असत. शिकार करणें, मासे मारणे, शेतकी वगैरे धंदे त्यांच्यांत उत्कर्ष पावले होते. लिहिण्या वाचण्याची कलाही ह्या लोकांस माद्दित होती. लांकूड अथवा वेळू यांच्या तुकड्यांवर तत्कालीन पुस्तकें लिहिली जात असत. लिहिण्याची साधनें लांकडी लेखणी व शाई ह्रीं असत. कधीं कधीं अणकुचीदार पोलादी पात्यानेही लिहीत. त्या वेळी वैद्यशास्त्राचीं मूलतत्वेंही त्या लोकांस माहित होती. निरनिराळे रोग व त्यांची कारणें या-