पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक १ ला.

१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१६, ६ डिसेंबर २०२३ (IST)

विषयी चर्चा करणारे एक पुरातन पुस्तक सध्यां अस्तित्वांत आहे. रोगांची जातवारी निरनिराळ्या ऋतूंच्या अनुरोधाने केलेली असे. व वनस्पती, झाडांच्या साली, प्राणी, खनिज पदार्थ, व धान्यकण ह्या पदार्थांचा औषध- योजनेच्या कामी उपयोग होत असे.

 ख्रिस्ती शकापूर्वी सुमारे एक हजार वर्षांपासून चिनी लोकांत आड- नांवाचा प्रसार सुरू झाला आहे. त्यापूर्वी मात्र आडनांवें नव्हती. गांवा- वरून पडणा-या आडनांवांखेरीज, नदी, पाषाण, गुद्दा, प्राणी, पक्षी, रंग, झाडे, फुले, पाने, यांच्या नावांवरूनही अनेक प्रकारचीं आडनांवें अस्तित्वांत आलेली आहेत. चिनी लोकांची एकंदर आडनावे सुमारे ४०० आहेत.

 ख्रिस्तीशकापूर्वी २०० वर्षेपर्यंत लहान लहान संस्थाने टिकलीं होतीं. त्यानंतर मोठ्या संस्थानाने लहान संस्थानास गिळून टाकण्याचा उपक्रम सुरू झाला. अखेरीस एका बलाढ्य संस्थानाने सर्व संस्थानें गिळून टाकली व त्या संस्थानच्या अधिपतीनें चिनी साम्राज्याची स्थापना केली. गेली २ हजार वर्ष हें साम्राज्य टिकलें; मात्र तें वेळोवेळी निरनिराळ्या राजघराण्यांच्या ताव्यांत जात आले आहे. ज्याने ह्या साम्राज्याची स्थापना केली त्याची युरोपियन इतिहासकार नेपोलियनबरोबर तुलना करितात. त्यानेच आपणांस चिनचा पहिला बादशहा ह्मणवून घेतलें. ह्या बादशहानेंच चिनांतील उपरोक्त अवाढव्य तट बांधिला. हा तट कैद्यांच्या श्रमाने बांधलेला आहे. त्यानें आपल्या नांवाचें तांब्याचे नाणे पाडलें. त्याने वाङ्मयाची अभिवृद्धि करण्याकरितां एक विलक्षण मार्ग काढला. पूर्वीची जुनीं पुस्तकें जाळून टाकून सर्व विषयांवर नवीन पुस्तकें तयार करण्याचे त्याने ठरविलें ! मात्र कृषिशास्त्र, वैद्यशास्त्र, फलजोतिष ह्या विषयांवरील जुनीं पुस्तकें त्यानें जाळली नाहीत. बाकीचीं सर्व पुस्तकें जाळण्याचा त्याचा सक्त हूकूम सुटला व ती लपवून जपून ठेवणारे कित्येक विद्वान् ह्याच्या कारकीर्दीत फासावर चढविले गेले ! हा बादशहा इ० स० पूर्वी २१० व्या वर्षी वारला. त्यानंतर त्याचा सर्वांत धाकटा मुलगा दुसरा बादशहा झाला. ह्या बादशहाची कारकीर्द पुष्कळ अंशी रिचर्ड क्रॉमवेलप्रमाणे होती. फरक इतकाच कीं, अल्प कालांतच ह्या बादशहाचा वध होऊन साम्राज्यसत्ता हन घराण्यांतील पुरुषाकडे आली. हा पुरुष प्रथम केवळ एक सामान्य शेतकरी होता. परंतु, शील व पराक्रम यांच्या जोरावर तो पुढे आला व त्यानें आपले वर्चस्व स्थापन