पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक १ ला.

१४:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१३, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

भाषाभेदाप्रमाणे १८ परगण्यांतील निरनिराळ्या भागांत लोकांच्या चालीरीति, शिष्टाचार, यांतही अनेक प्रकारचे भिन्नत्व आहे. हे भिन्नत्व महत्वाच्या बाबतींत नसून किरकोळ बाबतींतच आहे. उदाहरणार्थ, लग्नाचीच चाल घ्या. ह्या बाबतींत दागिने घेण्यासंबंधी जे सोहाळे व शिष्टाचार आहेत ते प्रत्येक परगण्यांत निरनिराळ्या प्रकारचे आहेत; परंतु लग्नाची नोंद करण्याची पद्धत सर्वत्र सारखीच प्रचारांत आहे. तसेंच लग्नामध्ये नवरानवरीने गुडघे टेकून परमेश्वरास साक्षास बोलावून तांबड्या दोन्याने एकत्र केलेल्या दोन पेल्यांतील मद्याच्या संस्काराने वैवाहिक शपथ घेण्याचा जो मुख्य विधि आहे तोही सर्वत्र सारखाच प्रचारांत आहे. तांबडा रंग हा चीन देशांत आनंदाचा द्योतक मानला जातो व त्या कारणाने चिनी नोटपेपर तांबड्या रंगाने आंखलेला व त्यावर तांबडे चित्र असलेला आढळून येतो. पांढरा रंग हा तिकडे अमंगल मानला आहे.

 चीनी परगण्यांत मोठमोठ्या नद्या आहेत व त्यांतून लहान बोटींच्या (होड्या नावांच्या) द्वारे प्रवास केला जातो. हे जलप्रवासाचे मार्ग एकमेकांस जोडण्याकरितां लहान लहान कालवे बांधलेले आहेत. एक कालवा अतिशय मोठा आहे. हा कालवा दक्षिणेतून पेकींग शहरास तांदूळ वाहून नेण्याकरितां तयार केलेला आहे. तो १३ व्या शतकांतील कुबलाइखान नामक बादशहाने बांधला असून त्याची लांबी सुमारे ६५० मैल आहे. ह्या कालव्यामुळे पेकींगपासून कँटन शहरापर्यंत एकसारखा जलप्रवास करण्याची सोय झालेली आहे. ह्या कालव्याचे बांधकाम फार भक्कम असून कुशलतेच्या दृष्टीनेही ते आधुनिक एंजिनिअरींग कामापेक्षा सरस असल्याचे तज्ञ मंडळानेच कबूल केले आहे.

 चिनांतील प्रख्यात तट-भीत-तर सर्वत्रांस माहित आहेच. युरोपियन स्थापत्य ( आर्किटेक्चर ) कलेचा जेव्हां मागमूसही नव्हता तेव्हां हे भव्य तटाचे काम तयार करण्यांत आलेले आहे. ही भिंत ऊर्फ तट १८०० मैल लांब, २२ फूट उंच व २० फूट रुंद असून ती पेकींगच्या पूर्व टोकापासून तिबेटच्या उत्तर सरहद्दीवर पसरलेली आहे. त्यांत १०० यार्डीच्या अंतराने ४० फूट उंचीचे बुरूज आहेत. ही भिंत मुळांत विटांची ( पक्कया ) बांधलेली असावी असे आढळून आले आहे. ह्याशिवाय आणखीही कित्येक लहान