पान:चित्रा नि चारू.djvu/७०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "फातमा, आता येथून केव्हा जाऊ ?"

 "बाबांबरोबर जा. ते सारे करतील."

 "फातमा, तुझे उपकार ! तुझ्या मोलकरणीचे उपुकार !"

 "चित्रा, प्रेमाला उपकार शब्द नको लावू. "

 इतक्यात खाली मोटार वाजली.

 "आले वाटते ? चित्रा म्हणाली.

 फातमा उठली. तिने दार उघडले. दिलावर व आमदारसाहेब आले होते.

 "आली का ग तुझी मैत्रीण ? " आमदारांनी विचारले.

 " हो बाबा, तुम्ही गेलेत नि ती आली. चला, तुमची ओळख करून देते."

 फातमी आली. कोट वगैरे काढून आमदारसाहेब आले, दिलावर आला. त्यांनी हातपाय धुतले. फातमाने टुवाल दिला.

 " ही का तुझी मैत्रीण ?" आमदारांनी विचारले.

 " हो." फातमा म्हणाली.

 "चित्रा, हे माझे बाबा ! मी सांगत असे ना तुला यांच्याविषयी ! आणि हे दुसरे कोण? ओळख ! "

 "तुझे यजमान."

 होय. यांचे नाव दिलावर."

 "यांचे नाव मी रहीम ठेवले आहे." चित्रा म्हणाली.

 "वा ! छान नाव आहे." आमदारसाहेव म्हणाले, रहीम नाव ऐकून दिलावर काळवंडला. तो काही खाईना ; तसाच तो स्वस्थ बसला.

 "दिलावर, तुम्ही हातसे धरून ? भाजी फक्कड झाली आहे ! फातमा, तुझ्या मैत्रिणीस श्रीखंड वाढ की ! "

 "बाबा, ती जरा आजारी आहे."

 "आणि दिलावर आजारी आहेत वाटते ?"

 "त्यांनाही जरा बरे नाही."

 " काय होते त्यांना ? "

 " मी लवकरच सांगेन, त्यांना काय होते ते."

७२ * चित्रा नि चारू