पान:चित्रा नि चारू.djvu/६१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "एकदोनदा आले, तिच्या नव-याचे नाव दिलावर. तोही स्वभावाने उदार व प्रेमळ आहे असे तिने लिहिले होते. परंतु पुढे बरेच दिवसात तिचे पत्र नाही. तुम्ही ओळखता माझी फातमा ?"

 " जगात लाखो फातमा आहेत. "

 "परंतु माझ्या फातमासारखी प्रेमळ कोण असेल ? " रहीम, म्हणजेच दिलावर निघून गेला. कुलूप लावून निघून गेला. तो घरी आला. फातमा काही विणीत बसली होती.

 " दिलावर !"

 " काय फातमा ? "

 "सोड हो तुझे फंद. तू मला रडवतोस. तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत असते."

 "परंतु मी काय केले वाईट ? "

 " ही चैन सोड. चैनीसाठी तुला पैसा पुरा पडत नाही. तू पैशासाठी खोटेनाटे करू लागशील. इज्जत घालवून बसशील. माझे ऐक, माझे स्त्रीधनही तुला दिले. तुझ्यासाठी मी भिकारी झाल्ये."

 " तुला आता मी श्रीमंत करीन. पाच हजार रुपये तुला मी आणून देईन. तुझे पाच हजार मी खर्च केले, होय ना ?"

 " दिलावर, माझे म्हणजे तुझेच हो. माझे द्यायला नकोत परत. परंतु चैन कमी कर, आपण गरिबीने राहू, परंतु अब्रूने राहू. कोठून रे आणणार आहेस पाच हजार ? जुगार खेळून ? दरोडा घालून?"

 "मिळणार आहेत! बघ एक दिवस. तुझ्यासमोर आणून रास ओतीन,हे काय करते आहेस "

 "माझ्यावर प्रेम करणाच्याला फ्रॉक, "

 "कोण करते तुझ्यावर प्रेम?"

 "तूच सांग."

 "मी. होय ना ? तुला हे कोणी शिकवले करायला ? "

 :माझ्या एका मैत्रिणीने. "

 "काय तिचे नाव ? !

चित्राची कहाणी * ६३