पान:चित्रा नि चारू.djvu/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेम करू लागल्ये. तिला माझ्या माहेरी नेले.परंतु तेथे तिने हा चावटपणा केला. कशी मी तेथे राहू? कसे त्या गावात तोंड बाहेर काढू ? चारू, मला देवाचेचं काही हेतू दिसतात. चित्राजवळ लग्न होऊन इतके दिवस झाले. तुला मूलबाळही झाले नाही. तीही आता बाहेर पडली. तिच्याशी तुझा नकोच संबंध, तिच्या द्वारा नको आपला वंशतंतू राह्यला, असे देवाच्या मनात असावे. मी सांगू का, ती माझ्या मैत्रिणीची मुलगी अद्याप लग्नाची आहे. जणू तुझ्यासाठीच देवाने तिला अद्याप अविवाहित ठेवले आहे. काहीतरी अडचण येते व तिचे लग्न मोडते. तुझीच ती आहे. लहानपणापासून तुझ्या आईने जे योजले, तीच जणू देवाचीही योजना होती. तू माझे ऐक. जाऊ दे ती चित्रा चुलीत. तिच्या बापाला एक पत्र टाक. मोकळा हो. दुसरे लग्न लाव. संसार कर. माझ्या मांडीवर नातवंड दे हो चारू.

 "आई, मला जगावेसे वाटत नाही. चित्रा माझ्या जीवनाचा आधार होती. किती तिचे माझ्यावर प्रेम ! काही तरी घोटाळा आहे. आई, मनात येते, की तुझे व त्या तुझ्या मैत्रिणीचे हे कारस्थान आहे. त्या मुलीची घोरपड माझ्या गळ्यात बांधण्यासाठी तुमचे हे उद्योग आहेत. चित्राला तिकडे नेता यावे म्हणून तू एकदम खोटे वरपांगी प्रेम तिच्यावर करू लागलीस. त्या कोणा पुत्रदादेवीची कथा रचली. तिला नवस केला म्हणजे मुलगी होतो, असे त्या भोळ्याभाबड्या मुलीच्या मनात भरवलेस. आई, सारे तुझे कारस्थान. तू माझी जन्मदाती, परंतु माझ्या मनात असे येते खरे, मी जातो, चित्राचा शोध करायला जातो. तिच्या आईबापांस मी काय सांगू ? अरेरे, चित्रा, कोठे आहेस तू? आई, तिला मारलीत तर नाही ? विहिरीत तर नाही ना लोटलेत ? विष नाही ना दिलेत ? खड्यात नाही ना लोटलेत ? कड्यावरून नाहीं ना लोटलेत ? आई, माझी चित्रा दे. तू माझी चित्रा चोरली आहेस. चित्रा दे. नाहीतर तुझा मुलगा मेला समज. नको हे घर, ही जहागीर. दे, चित्रा नाही म्हणजे काही नाही. अकपट प्रेमळ मुलगी. म्हणे एकदम कशी तुझ्याजवळ बोलली ! आई, आमची जणू शतजन्मांची ओळख होती असे वाटले. माझ्या प्राणांना तोच जणू दुरून पोषीत होती आणि

चित्राचा शोध * ४९