पान:चित्रा नि चारू.djvu/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "चित्रा, उगीच तुला त्रास दिला हो. जा हो ते विसरून. यापुढे तुला जणू मुलगी मानीन. तुला लागेल ते माग. समजलोस ना ! प्रकृतीची काळजी घे. चारू तुला टॉनिक देत असे मागे, त्याची बाटली आणवू का पुन्हा ?"

 "नको हो आई. आता बरी आहे प्रकृती, तुम्ही प्रेम द्या म्हणजे सर्व काही मिळाले."

 "देईन हो बाळ."

 आता अगदी शुक्लपक्ष होता. चित्रेच्या संसारात प्रेमाचे व सहानुभूतीचे चांदणे होते. दुःख, शोक, चिंता यांना जागा नव्हती.

 "चित्रा, मी नव्हतो सांगत, की आई पुढे निवळेल म्हणून ?"

 "मलाही वाटत होते, की ज्याच्या पोटी चारू येतो त्या कायमच्या कठोर कशा राहातोल? "

 "आता तू सुखी आहेस ना ?"

 "चारू, ज्या दिवशी मी पुत्रवती होईन, त्या दिवशी खरी सुखी होईन. तुझ्या मांडीवर बाळ देईन, तेव्हा मी धन्य होईन."

 "तीही इच्छा देव पुरवील."

 काही दिवस, काही महिने, असे आनंदात गेले. एके दिवशी सासूबाई सुनेजवळ काहीतरी बरेच बोलत बसल्या होत्या. कशाविषयी होते ते बोलणे ? आपण चला ऐकू, कळेल धागादोरा.

 "येशील ना माझ्याबरोबर? येच, माझ्या माहेरच्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. कितीदा तरी त्यांची पत्रे आली, की येताना चित्राला पण घेऊन ये म्हणून. ये माझ्याबरोबर. जरा तुला थारेपालट होईल. माझे माहेर फार छान आहे. मोठा गाव आहे. गावाबाहेर देवीचे देऊळ आहे. जंगलात आहे. तेथे तू , मी जाऊ. देवीला मुलासाठी नवस करू. ती देवी नवसाला पावते. पुत्रदादेवी असेच तिचे नाव आहे. तुला मूलबाळ होत नाही, म्हणून चारूसुद्धा खिन्न असतो. आपण जाऊ. त्या देवीला जाऊ."

 "येईन मी. आणि तुम्ही एकट्या गेल्यात तर मला येथे करमायचे नाही. तुमचा हल्ली लळा लागला आहे मला. माहेरची आठवण खरेच

चित्रावर संकट * ४१