पान:चित्रा नि चारू.djvu/३०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


येतात करायला." सासू वा पट्टा चालला होता. चित्राने जाते घातले. ती दळीत होतो. दोन्ही हातांनी दळीत होती. तिला जाते ओढेना. तरी कष्टाने दळीत होती. इतक्यात शेतावरून चारू आला. तो चित्रा तेथे दळीत आहे. डोळ्यात पाणी आहे.

 "चित्रा, ये. आपण दोवंजणं मिळून दळू. ये. रडू नकोस आता. हस."

 " चारू, नको, तू जा. सासूबाई रागावतील. माझी लाज राख. जा."

 "मी नाही जाणार. मी तुला हात लावणार."

 " नको रे चारू. माझी फजिती का करायची आहे ? गडीमाणसे येतील, मोलकरणी येतील. मला हसतील, म्हणतील, त्यांना दळायला बसवलं. जा हो चारू. तुझे माझ्यावर प्रेम आहे, ते दळायला लागून नको हो दाखवायला, जा, जा."

 "मी जाणार नाही. घाल दाणे. "

 "हट्टी आहेस तू चारू."

 "आणि तुही हट्टी आहेस."

 "बरे ये. दळू दोघं. तू गेलास म्हणजे सासूबाई याचे उट्टे काढतील."

 "तू आपली नेहमी माझ्याबरोबर राहात जा."

 "नेहमी कशी तुझ्याबरोबर येऊ ? असा काय धरतोस खुंटा ? "

 " तुला तरी कोठे माहीत आहे ? दळले आहेस का घरो कधी ?"

 दोघे दळत होती. चित्रा आनंदली होती.

 " चित्रा, ओवी म्हण की. बायका ओव्या म्हणतात."

 "मला नाही येत."

 "एकदोन तरी येत असतील हो. म्हण, "

 आणि चित्राने ओवी म्हटली,

  दळण दोघे दळू  हात दोघांचे लागती
  चित्रा नि चारू यांची  एकमेकांवरी प्रीती ।।
  एकमेकांवरी प्रीती  वाणीने मी व किती
  एकमेकांच्या हृदयी  एकमेकांची वसती ।।
  चारुराया चित्रा शोभे  जशी चंद्राला रोहिणी

  पतीला ती निज प्रेमे  घाली सदैव मोहिनी ।।

३२ चित्रा नि चारू