पान:चित्रा नि चारू.djvu/१५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 " माझे बाबा तसे नाहीत. ते साधे आहेत. शेतकरी घरी आले, तरी त्यांना बैठकीवर बसवतात. त्यांना पानसुपारी देतात. आम्ही तुम्हाला बोलवू हां, परंतु आधी सांगा, मी करू का गुच्छ ? एक तरी करत्येच. तुम्हाला हो द्यायला. तुमच्या वडिलांना द्यायला मला भीती वाटेल, लाज वाटेल."

 " आणि मला द्यायला ? "

 " आनंद वाटेल. तुम्हाला द्यायला कसली आहे भीती ?"

 " करा तर मग. मी जातो हे दोन घेऊन."

 " परंतु तुमचे नाव काय ? "

 " माझे नाव चारू."

 "चारू म्हणजे सुंदर, होय ना ?"

 " मला संस्कृत फारसे येत नाही."

 " तुम्ही कॉलेजात होते. मला माहीत आहे."

 " तुम्हाला काय माहीत ?"

 " एक दिवस बाबा आईला सांगत होते."

 " तुम्ही चोरून ऐकलेत वाटते ?”

 * कानावर आले. कान मिटण्याऐवजी ते अधिकच ताणून ऐकू लागल्ये."

 "का बरे ?"

 "माझ्या लग्नाची कुणकुण घरात चालली आहे हे मला माहीत होते. आपल्या लग्नासंबंधीचे बोलणे कोणाला ऐकावेसे वाटणार नाही."

 " कॉलेजात शिकलेला पाहिजे वाटते तुम्हाला नवरा ? तुम्ही मामलेदारांच्या कन्या. तुम्हाला चांगला आय्. सी. एस्. मिळेल की नवरा."

 " परंतु चारू म्हणजे सुंदर ना?"

 " होय."

 " माझे नाव माहीत आहे का तुम्हाला ?"

 " माझ्या घरी थोडेच कोणी लग्नाचे बोलतो ? कसे कळणार तुमचे नाव?"

चित्रेचे लग्न * १७