पान:चित्रा नि चारू.djvu/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 चित्राने फातमाला ती ओढणी दिली. फातमाने खांद्यावरून व डोक्यावरून ती घेतली. छान दिसत होती.

 "फातमा, किती तू छान दिसतेस ? "

 "चित्रा, तुही मला सुरेख दिसतेस."

 "ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते नेहमी चांगलेच दिसते." बळवंतराव म्हणाले.

चित्रा नि चारू.djvu
महंमदसाहेबांची बदली * १३