पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७५ ) की तुझांस जय प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्यांस अनुभव आला तेव्हां परत येतांना त्यांनी श्रीचें दर्शन घेऊन गाँव इनाम करून दिले ते अद्याप त्यांचे वंशजाकडे चालू आहेत. ही गोष्ट शके १७०० विलंबनामसंवत्सरी घडली. यांनी शके १७२४ कार्तिक वद्य १२ रोजी समाधि घेतली ७ श्रीचिंतामणि महाराज (तिसरे) १ श्रीनारायण महाराजांचे हे ज्येष्ठ पुत्र त्यांच्या पश्चात् संस्थानचे मालक झाले. हे साक्षात्कारी सत्पुरुष होते परंतु यांनी गादीचा उपभोग फार दिवस घेतला नाहीं हे शके १७२७ आषाढ शु || ४ स समाधिस्त झाले. यांस औरस संतती नव्हती व श्रींची आज्ञाही सात पिढ्यांपर्यंतच औरस संततीस उपभोग घेता येईल अशी होती त्याप्रमाणेंच शेवटी झालें. नंतर यांनी धरणीधर महाराजांस दत्तक घेतलें. ८ श्रीधरणीधर महाराज ( दत्तक ) १ श्रीचिंतामणि महाराजाचे हे दत्तक पुत्र हेही साक्षात्कारी सत्पुरुष व व्यवहार चतुर होते. यांचा जन्म शके १७२२ साली झाला. हे एकदां निजाम हैदराबादेस गेले होते तेव्हां त्यांचा दिवाण चंदूलाल यानें महाराजांचें सत्व पाहावें ह्मणून एका सबर असलेल्या घोडीस व गाईस काय.