पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७४ ) झाला. त्याप्रमाणे ते चिंचवड येथे श्रीचे दर्शनास आले. प्रथम वाड्यांत गेले तों धरणीवर महाराज तेथें नसून दूर्वा आणण्या- करितां बागेंत गेले होते. ह्मणून कारभारी मंडळींनी महाराजांचे बंधूसच हे महाराज ह्मणून दाखविले परंतु शाहूमहाराजांस स्व- प्रांत जे पुरुष दिसले ते हे नव्हत असें वाटून त्यांनी चौकशी केली. त्यावरून ते दूर्वा आणण्याकरितां बागेत गेल्याचें वृत्त त्यांना समजलें ह्मणून शाहूमहाराज श्रीमोरयाचे देवालयाकडे दर्शनास गेले. तों श्रीधरणीधर महाराज तिकडून येत होते. उभयतांची दृष्ट होतांच खुणापटून शाहूमहाराजांनी श्रींस साष्टांग दंडवत घातलें. श्रीनी तेथेंच प्रसाद दिला ही भेट जेथें झाली त्या खड- काला राजाबेंडा ह्मणतात. नंतर कांहीं दिवस मुक्काम पडून शाहूमहाराज परत गेले. हे शके १६९४ मार्गशीर्ष वद्य ६ स समाधिस्त झाले. ६ श्रीनारायण महाराज (धाकटे ) १ श्रीधरणीधर महाराज यांचे हे वडील पुत्र होत यांस सि- द्वि अनुकूल असून हे सत्पुरुष साक्षात्कारी होते. एकदां श्री- मंत माधवराव पेशवे यांनी इंग्रज सरकारावर स्वारी करण्याचा मनोदय करून ओझर येथें श्रीचेदर्शनास नानाफडणीस व स खारामबापू ह्यांसहवर्तमान गेले. त्यावेळी श्रींचा प्रसाद झाला.