पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७६ ) होईल ह्मणून विचारलें त्यावरून महाराजांनी त्यांस उत्तर दिलें. पुढे त्यांनी त्यांस ती जनावरें प्रसूत होईपर्यंत ठेवून घेतलें. दोन्हीं जनावरें प्रसवल्यानंतर पाहतात तो महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव आला त्यावरून दिवाणांनी निजामसरकारा कडून महाराजांस देणगी देवविली. यांचा काल शके १७७४ अधिक भाद्रपद व||४ ता. २ सप्टेंबरसन १८५२ रोजी झाला. २ श्रीधरणीधर महाराज गादीवर असतांना त्यांचे पुत्र श्री- चिंतामण महाराज हे अल्पवयी वारले. धरणीधर महाराज यांच्या कुटुंबांनी गणपतदेव या नांवाचे इसम दत्तक घेतले असें ह्मणतात. यांना सुमारें २० वर्षे संस्थान चालविलें तसेंच श्रीचिंतामण महाराजांच्या बायकोनेंही एक भालचंद्र देव या नांवाचे इसम दत्तक घेतले होते. उभयतांचा तंटा सुरू झाला व कोर्टात निकालासाठीं प्रकरण गेलें. त्यावेळीं निकालांत दोघेही श्रीची सेवा करण्यास अनधिकारी ठरले. नंतर कोटांनी संस्था- नची व्यवस्था तीन ट्रस्टींच्या हाती दिली त्यावेळेपासून हल्लींचे महाराज धुंडिराज गणेशदेव हे चीफट्रस्टी या नात्यानें संस्थानचे पट्टाभिषिक्त महाराज ह्मणून काम पाहत आहेत ( इ. स. १८९० तारीख १६ आगष्ट ) श्रीमंगलमूर्तीचें संस्थान नंबर १ श्रीमोरयागोसावी यांनी श्रीमंगलपूर्तीस प्रसन्न करून त्यांनी