पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७३ ) प्रतिमा उठविली आहे व शेजारी त्यांच्या पत्नीस दिलेल्या वराप्रमाणें तिचीही प्रतिमा उमटली आहे. हल्लीं ह्या दोन्ही प्रतिमा एकत्र असलेल्या जागीं देऊळ बांधिलें आहे ( शके १६४१ आरंभ मार्गशीर्ष शुद्ध १० समाप्ति १६४२ शर्वरी नाम संवत्सरे वैशाख श्रु. ३ ) ४ धाकटे श्रीचिंतामणि महाराज, १ हे श्रीनारायण महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होत हे सत्पुरुष असून साक्षात्कारी होते. यांनी आपला काळ श्रीमंगलमूर्तीच्या सेवेंत घालविला. यांचे कारकीर्दीत श्रीनारायण महाराजांनी बांधिलेली देवालयें थेऊर, शेवरी येथील पूर्ण झाली. यांनीही आणखीं कांहीं देवालयें बांधिलीं आहेत. याशिवाय यांचा इतिहास उपलब्ध नाहीं यांनीं शके १६५८ कार्तिक वद्य १२ रोजी समाधि घेतली. ५ श्री धरणीधर महाराज ( थोरले.) १ श्रीधाकटे चिंतामणि महाराज यांचे हे वडील पुत्र होत. हेही साक्षात्कारी असून सत्पुरुष होते. यांचे कारकीर्दीत सातारचें शाहुराजास श्रीचे दर्शनास जाण्याबद्दल मंगलमूर्तीचा दृष्टांत +टीप- हे नरनारायणाचे अवतार होत ह्मणून द्विमुख उमटले आहेत अर्से कोणी सांगतात.