पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७२ ) दहनस्थलों देवालय बांधून ब्राह्मणद्वारा पूजा सुरु आहे. व दरसाल चोळी पातळहा संस्थानांतून द्यावें लागतें देह ठेवितांना तिनें आपल्या संनिध मला स्थान द्यावें येवढे मागून घेतले होतें. पुढें श्रीनारायण महाराज यात्रेस जाऊन परत चिंचवड येथें आले. ८गंगाधर नाईक या नांवाच्या गृहस्थानें लढाईत यश मिळावें ह्मणून चिंचवड येथें येऊन पवनाबाईंत उभें राहून एकवीस दिवस अनुष्ठान केलें. श्रीमोरया प्रसन्न होऊन त्यांनी त्यास एक प्रासादिक तरवार श्रीनारायण महाराजांच्या हातानें देव- विली. नाईकानें तिचा भक्तिपूर्वक स्वीकार करून वसईचा किल्ला घेण्याचे कामीं पराक्रम करून तो सर केला. श्री- ९ निरंजन नांवाचा एक ब्राह्मण मोरगांवास श्रीमंगलमूर्तीची भक्तिकरून राहिला होता. त्याच्या भक्तींनी श्री प्रसन्न होऊन डोळूं लागले. इतक्यांत श्रीनारायण महाराजांची स्वारी श्री- दर्शनास आली ह्मणून त्यांच्या लोकांनी त्यास तेधून घालवून दिलें तो बिचारा भैरवाजवळ जाऊन बसला हे पाहून मंगलमूर्तीही तेथे गेले हा चमत्कार पाहून श्रीनारायण म हाराजांनी त्यांस स्वतः सन्मानानें परत देवालयांत आणवून आपल्या उजव्या बाजूचा त्यास मान दिला. श्रीनारायण महाराजांनी शके १६३२ भाद्रपद शु. ७ रोजी हा नश्वरदेह विसर्जन केला. त्यांना जेथें दहन केलें तेथें श्रीगणपतीची