पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७१ ) राज योगबळानें धूपारतीचे वेळीं हजर राहिले हें त्यानें पाहून त्यांनाच कसे सुटून आलांत ह्मणून विचारिलें; त्यावरून त्यांनी खरें वृत्त निवेदन केलें. तेव्हां बादशाहाची पूर्ण खात्री होऊन नारायणमहाराजाबद्दल पूज्यबुद्धि उत्पन्न झाली व हा एक हिंदूंचा अवलिया (देव) आहे अशी त्याची भावना होऊन त्यानें त्याचा छल करण्याचा नाद सोडला इतकेच नव्हे तर आणखी कांहीं गांवच्या सनदा लिहून त्या मोठ्या भक्तीपूर्वक अंतःकरणानें महाराजांस अर्पण केल्या. ६ एके वेळी श्रीनारायणमहाराजांचें सत्व हरण करण्याच्या हेतूनें चाकणाहून एक हजार ( मुसलमान ) फकीर चिंचवड येथें येऊन उतरले आणि भोजन मागूं लागले. त्यावेळी महा- राजांनी एका ताटांत एक जोंधळ्याची भाकरी झांकून आणि- ली व मंगलमूर्तीचें नांव घेऊन त्यास वाटण्यास सुरवात केली. सर्व फकीरास भाकरी मिळाल्या हें पाहून ते महाराजाचा जय- जयकार करीत गेले. ७ श्री नारायण महाराज भाद्रपदीच्या यात्रेस निघाले असतां वाटेनें कोथळे गांवीं देसाई पाटलाची बायको आसन्न मरण झाली तेव्हां महाराजांनी. तिला त्यांचे विनंतीवरून उठवून तिचेबद्दल आपल्या थोरल्या कुंटुंबास देह ठेवण्यास आज्ञा केली. ती तिनें मान्य करून तत्काळ देह ठेविला. तेव्हांपासून