पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७० ) रास गेले तेथेंही शंकरांनी व्याघ्ररूपांनी दर्शन देऊन दृष्टांत दिला की, तूं गुर्वाज्ञेप्रमाणें परत गांवीं जाव दरवर्षी मोरयाची भाद्रपदींची यात्रा कर. एके वर्षी ते मोरगांवीं यात्रेस जात असता वाटेंत भीमेस पाणी फार आल्यानें त्यांस पलीकडे जातां येईना शेवटी त्यांनी देव गळ्यांत घालून पाण्यांत उडी टाकिली तों ते पेडगांवापर्यंत वाहावले. इकडे श्रीनारायणमहारा- जास त्यांस आणण्याविषयों दृष्टांत झाला त्याप्रमाणे त्यांनीं मनुष्य पाठवून दादाजीस मोरगांवीं आणविलें व यापुढें तूं या यात्रेस येऊं नकोस ह्मणून शपथ घातली व हा उत्सव तूं आपले गांवीं करीत जा अशी आज्ञा केली आणि सातारकर महारा जाकडून खर्चास इनाम देवविलें तें अद्याप त्यांच्या वंशजा- कडे आहे. ५ श्रीनारायण महाराज हे आपल्या पदरीं हत्यारबंद माण- सें ठेवून आसपास लुटालूट करून खंडणी मिळवितात हे वृत्त बादशहाच्या कानावर गेलें तेव्हां त्यांनी त्यास पकडून आणून नजरकैदेत ठेविलें ते दिवस उत्सवाचे होते महाराजांस नित्याप्रमाणें दररोज धूपारतीचे वेळीं चिंचवडास जावें लागे ते दररोज गुप्तपणानें जातात असें जाणून बादशाहानें त्यास एका मोठ्या पेटीत घालून बंदोबस्तानें ठेविलें व आपण स्वतः चिंचवड येथें धूपारतीचे वेळी त्यास पाहण्यासाठी हजर राहिला. इकडे महा