पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६८) आपल्या आजाच्या श्रीमोरयागोसावी यांच्या समाधीचें द्वार उघडलें व दाराचे तोंडीं जातात तोंच आंतून शब्द झाला कीं, पुढें येऊं नको. तूं माझे समाधीचा विक्षेप केलास. प्रभूच्या आज्ञेप्रमाणें सात पिढ्या साक्षात्कार होईल परंतु पुढें औरस संततीचा लाभ मात्र होणार नाहीं. तें ऐकून त्यांना कृतक- मचा पस्तावा झाला. व त्यांनी श्रीमोरयांची क्षमा मागून समाधीचे द्वारावर कायमचें शिवलिंग-श्रीचिंतामणिमहाराजांनी आणलेलें- प्रस्थापित केलें. तें अद्याप दिसून येतें. पुढे यांनी मोठेपणीं बरेच दैविक चमत्कार केले. त्यांतील कांहीं येथें दिले आहेत. - २ चिंचवड येथें एके वद्य चतुर्थीस वाकसानें भाजी तोडीत असतां तींत एक सर्प तुटला गेला व तो न कळत भाजीबरोबर शिजत पडला. सर्व स्वयंपाक तयार झाला पात्रें वाढून सिद्ध झाली. ब्राह्मण भोजनास बसणार तोंच श्री मंगलमूर्तीनी ब्रा- ह्मणास विष बाघेल हें जाणून विष शोषण्यास प्रारंभ केला. व सर्व मूर्ती हिरवी गार झाली परंतु त्याचें कारण कोणास समजेना. शेवटीं भोजनास बसलेल्या एका गृहस्थाच्या पानांत त्या सापाचा एक तुकडा आला तो त्यानें पाहिल्याबरोबर त्याचा गवगवा केला. त्यावरून चौकशी करून पाहिलें तों सर्व सापाचे तुकडे सांपडले. मंगलमूर्तीने सर्व विष शोषून घेत