पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६७ ) मिळालें आहे तें अद्याप त्यांचे वंशजाकडे चालत आहे नंतर थोडक्याच दिवसांनीं गणेशदेव कैलासवासी झाले. आपले प्रियभक्त गणेशदेव निवर्तल्याचें वृत्त ऐकून महाराजांस वाईट वाटलें. व त्यांनीही पुढें लौकरच देह ठेवावा ह्मणून निश्चय ठरविला. आणि स्वहस्तें एक गुहा तयार करून तिच्यांत. जिवंत समाधि घेण्याचा आपला मानस श्रीमोरयांचे चरणीं निवेदन केला. श्रीमोरयांनीं स्वमदृष्टांतानें तूं जिवंतसमाधि घेऊं नकोस अशी आज्ञा केली तेव्हां त्यांनी त्याच गुहास्थानीं मरणोत्तर दहन करवावें ह्मणून आपल्या पुत्रांस सांगून ठेविलें शेवटी पौष वद्य ४ शके १५४७ क्रोधननामसंवत्सर रोजी ● रात्री चंद्रोदय भोजनोत्तर श्रीचिंतामणिमहाराजांनी आपला देह श्रीमंगलमूर्तीचें नामस्मरण करीत विसर्जन केला. त्यांच्या पुत्रांनी त्यांच्या इच्छेप्रमाणें गुहेंत दहन केलें तो मूर्तिमंत गणेशमूर्तीची प्रतिमा खाली उमटली ती अद्यापिही आहे. नंतर त्या जागेवर देवालय बांधलें. ३ श्रीनारायण महाराज. १ श्रीचिंतामणिमहाराजांस दोन कुटुंबांपासून ४ मुलगे झाले त्यांत वडील श्रीनारायणमहाराज हे होत यांचा जन्म शके १५२३ माघ शु. ७ झाला. हेही सत्पुरुषच होते परंतु यांनी आपल्या लहानपणीं दैविक चमत्कार केले नाहींत. यांनी