पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६६) दर्शनास आला त्याची भक्ति पाहून त्यास मोरगांवीं वारीस येत जा ह्मणून त्यांनी आज्ञा केली पुढे त्याचें नांव गणेशदेव असें पडलें. एकेवेळीं गणेशदेव पंढरपुरास गेले व श्रीमंगल- मूर्तीचीं पदें ह्मणूं लागले तेव्हां पंढरपूर मोरगाँवाप्रमाणे दिस- ल्याचा भास झाला. ह्मणून श्रीतुकाराम यांनीं अभंग ह्मणून भजनास सुरवात केली तों पूर्वी सारखी पंढरी दिसूं लागली. तसेच चमत्कार मोरगांवीं या दोन्ही साधूंनी लोकांस दाखविले. तेथें तुकाराम आल्याची साक्ष लोकांस पटावी ह्मणून त्यांनीं विठ्ठलमूर्तीची मोरगांवीं स्थापना केली. १५ पुन्हा एकेप्रसंगी शिवभक्तांनी शिवरूप मोरया दाखवावा ह्मणून विनंति केली. तेव्हां श्रीचिंताम- णिमहाराजांनी शिवरूप मोरया दाखविला. नंतर शंकर, विष्णु व सिद्धिविनायक अशीं तीन रूपें दाखवितांच सर्वांना अत्यानंद झाला. महाराज घरी गेले. त्यांचे मागून त्यांचे भक्त गणेशदेवही चिंचवडास आले. व त्यांनी मागित- ल्यावरून व त्याची एकनिष्ठ भक्ति पाहून त्यांना एक मासा- दिक गणेशमूर्ती दिली ती त्यांनी हातांत घेतांच तीन कलेचा बाण झाला मुळांत श्यामवर्ण, मध्यें श्वेतवर्णव मस्तकीं रक्तवर्ण याप्रमाणें तीन रंगी तीन कलांची बाणाकृति पाहून त्यास त्यांनी कलाधरेश्वर नांव दिलें व त्याची स्थापना गणेशदे- वानी आपले घरों केली पुढे त्यास कांहीं उत्पन्नही इनाम