पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाहींत असें जेजुरीच्या खंडोबानीं मनांत आणून त्यांस स्वतः दर्शन दिलें आणि ह्मणाले मंगलमूर्ती व मी दोन नाहींत असें ह्मणून तसा प्रत्यय दाखविला. त्यावरून चिंतामणि महाराज जेजुरीस गडावर जाऊन श्रीखंडेरायाचें दर्शन घेऊं लागले त्या वहिवाटीप्रमाणे त्यांचे वंशज यात्रा करून आल्यावर दर्शनास जातात. पुढे येत असतां यमाईदेवीनें महाराजास दृष्टांतानें दर्शन घेण्याविषयीं सुचविलें व आपण वाटेवर येऊन त्यास दर्शन दिले तेव्हांपासून तिचें दर्शन घेण्याची वहिवाट पडली आहे. १३ कोथळे गांवीं कहानदीमध्यें एक शिवलिंग फार दिवस पडलें होतें तें घेऊन जाण्याविषयीं सासवड येथील एक अभा- विक सावकार पाहत होता शिवलिंगास सासवड येथे जावयाचें नसल्यानें सावकाराचे सर्वप्रयत्न फुकट गेले शेवटीं चिंताम- णमहाराजांस तें नेण्याविषयों दृष्टांत झाला तेव्हां ते एके वर्षी यात्रेस गेले असतां परत येतांना त्या शिवलिंगास आपल्या बरोबर घेऊन आले. ( श्रीमोरया महाराजांच्या गुहाद्वारावर त्याची स्थापना पुढे करण्यांत आली त्यास श्री अर्जुनेश्वर असें नांव असून तें हल्लीं मोरयाचे देवळांत दिसत आहे. ) १४ इसलामपूर नजीकच्या रेठरेगांवांतील मल्हार भक्त राम- भट उंडाळकर नांवाचा एक ब्राह्मण श्रीचिंतामणिमहाराजांच्या ५