पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६२) करा ह्मणजे ते येतील. इतक्यांत असा चमत्कार झाला की, श्रीचितामणि महाराजच शुडादंडमंडित चतुर्भुज गणेशरूप दिसं लागले. हें साधुद्रयांनी पाहून तत्काळ त्यांचे चरणीं वंदन केले व अनेकप्रकारें स्तुतिपर अभंग, आरती वगैरे करून त्यांस आळविलें. तीं पद्ये शेवटीं दिलीं आहेत. व ह्मणाले महाराज; आह्मी व आमची आराध्य दैवतें अशीं दोन रूपानें आम्ही बेगळे आहोत व तुझी व तुमचें दैवत हे एकच ह्मणजे प्रत्यक्ष मंगलमूर्तीरूप देव आहांत तेव्हां आजपासून तुमचें उपनांव देव असें ठेविले आहे हें उपनांव अद्याप त्यांच्या वंशास चालू आहे. श्रीमंगलमूर्ती भक्तास सोडविण्यास गेल्याचें वर लिहिलें आहे ते भक्तास सोडवून परत आल्यावर उभयसाधूंची खात्री पटण्याकरितां महाराजांनीं श्रींचा पितांबर पिळून दाखविला. तों तें क्षारोदक असल्याचें सर्वांस आढळलें. तेव्हां त्यांनी श्रीचिंतामणि महारांजाची साधुत्वाविषयीं लोकांत फार प्र सिद्धि केली भक्तांचें ब्रीद राखण्याकरितां श्रीपरमेश्वर काय -एक करणार नाहीं ! ! यावेळी झालेले संवादात्मक अभंग शेवटी दिले आहेत. १० सिद्धटेक येथील राहणारा गोपाळ नांवाचा ब्राह्मण धनप्राप्यर्थ तेथेंच श्रीगणेशचरणीं तप करीत बसला होता. त्याला दृष्टांत झाला कीं तूं चिंचवड येथें श्रीचिंतामणिमहाराजाक- डे जा ते तुझी इच्छा परिपूर्ण करितील. तेव्हां त्यास मोठें नवल