पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६१) होते. पूजा संपवून बाहेर आल्यावर उभयतांचे कुशल मन झाले; त्यावेळी देवांनीं श्रीतुकारामास केव्हां आलांत हा प्रश्न केला. तेव्हां " आपली स्नान संध्या चालली असतां बागेस पाणी दिलें नाहीं तें दिले पाहिजे असा विचार आपला चालला होता त्यावेळेसच मी येऊन दाखल झालों. " हा मनोमय संकेत जाणलेला पाहून देवास कौतुक वाटलें, नंतर श्रीदेवांनी त्यास भोजनास राहण्याविषयीं आग्रह करून ठेवून घेतलें तेव्हां दोघेही सहजी ह्मणाले कीं, अशा प्रसंगी श्रीराम- दासही अवचित येऊन उतरतील तर मग त्या आनंदास काय पारावार आहे ? हें भाषण संपते तोंच रामदास आकस्मिक येऊन उतरले देवांनी सर्वांचीच भोजनाची तयारी केली पात्रांची सिद्धता करणार तोंच लोकांस चमत्कार दाखवावा ह्मणून तुकाराम व रामदास ह्मणाले की, आज आपापल्या आराध्य दैवतेस ज्यांनीं त्यांनी प्रत्यक्ष भोजनास आणिलें पाहिजे, असें बोलून देवाकडून जास्त पात्रें वाढविलीं. देवांनीं या आग्रहांत न पडण्याविषयी उभयतांस सुचविलें. परंतु उपयोग झाला नाहीं श्रीतुकाराम यांनी रुक्मिणीपांडुरंगास आणलें श्रीराम- दास यांनीं श्रीसीतारामचंद्रादि देवांस आणलें श्रीमंगलमूर्ती आपल्या समुद्रांत बुडत असलेल्या भक्तांस सोडविण्यास गेल्या मुळे देवांस त्यास लौकर आणतां आलें नाहीं. तेव्हां श्रीचिता- मणि महाराज तुकारामास ह्मणाले की तुम्ही श्रीमंगलमूर्तीची स्तुति