पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६३) वाटलें कीं, जें काम प्रत्यक्ष देवाच्या हातून झालें नाहीं तें मनुष्या- च्या हातून कसें होईल ? तथापि एकादशं अनुभव घेऊन पहावा ह्मणून तो चिंचवडास आला व महाराजांचे दर्शनास गेला तोंच त्याला चिंतामणमहाराज ह्मणाले तुझी इच्छा मनुष्याच्या हातून कशी पूर्ण होईल हें खुणेचे बोलणें ऐकल्याबरोबर ब्राह्मण लज्जायमान होऊन शरण आला तेव्हां त्यास श्रींनी धूपातींचे वेळी येण्यास सांगितलें धूपार्ती नंतर त्यांस दाळीचा प्रसाद दिला व भोजन करून आपलेगांवी जाण्यास परवानगी दिली ब्राह्मणानें रागानें त्याचा त्याग केला व नशीबावर हात ठेवून तो • आपल्या कर्मास दोष देत परत गेला. वाटेनें अनेक विचार त्याच्या मनांत घोळून आपण विनाकारण इकडे आलों ह्मणून त्याला पश्चात्ताप वाटला. मध्यंतरी नदीवर स्नानासाठीं तो उतरला व पंचा सोडून पाहतो तो रात्रौ दिलेल्या दाळीपैकी राहिलेल्या दाळीचे सर्व होन झाले आहेत हे पाहून त्यांस फारच आश्चर्य वाटले व आपण दाळीच्या प्रसादाचा अव्हेर केला ह्मणून फारच दुःख झालें - लोभामुळे तो पुन्हा परत श्रीचिंतामणीमहा- राजाकडे आला परंतु महाराजांनीं तुझ्या नशीबांत जेवढे द्रव्य होतें तेवढेंच तुला मिळाले आतां जास्त मिळणार नाहीं. असे सांगून परत जाण्यास आज्ञा दिली ब्राह्मण नशीबाला दोष देत देत तडक चालता झाला. .