पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६० ) न निमंत्रित भिक्षुकांपैकीं कांहीं अज्ञ व शीघ्रकोपी ब्राह्मण महाराजांवर रागावून भोजन न करितां तसेच उठून परत गेले. महाराजांनी त्यांची पुष्कळप्रकारें समजून घातली परंतु त्यांचें समाधान झालें नाहीं अखेरीस राहिलेल्या ब्राह्मणांस भोजन घालून विडा दक्षिणा देऊन बोलविलें. तेव्हांपासून त्याच ब्राह्मणांकडे कुलोपाध्यायाचा मान सौंपविला. ८ एकदां अनगडशा नांवाचा एक अवलिया श्रीचिंतामणि महाराजांची कीर्ती ऐकून चिंचवड येथें आला व त्यानें एक तुंबा घेतला व तुंबाभर धान्याची भिक्षा मागितली. तेव्हां मंडळींनी त्यांत धान्य घालण्यास सुरवात केली कितीही धान्य घातलें तरी तुंबा भरेना. हें वृत्त शेवटी त्यांनीं श्रीचिंतामणिमहाराजांच्या कानावर घातले तेव्हां त्यांनीं योगबलानें त्याचें कारण जाणून एक दूर्वा श्रीमंगलमूर्तीच्या तीर्थात भिजवून त्या तुंब्यांत आणून टाकिली तेव्हां चमत्कार असा झाला की, सर्व धान्य त्या तुं- ब्यांतून आपोआप बाहेर येऊन तुंबा फक्त एकानेंच भ रला अनगडशा साधूनी हें पाहून मोठी धन्दा मानिली. महाराजांनी नंतर त्यास आदरपूर्वक भोजन घालून त्यांची रवानगी केली. ९ श्री तुकारामबुवास एकेवेळीं श्रीचिंतामणि महाराजांस भेटावें असें वाटून ते देहूहून चिंचवडास आले. महाराज पूजा करीत