पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५९) -- गेले असतां समुद्रांत बुडत असलेल्या त्यांच्या एका श्रीमान् भक्तानें त्यांची करुणा भाकिली. ती दीनवाणी महाराजांचे कर्णी पडतांच तेथेंच गुप्त होऊन ते भक्ताचें संकट निरसन करण्याकरितां तसेच धांवले व त्यांस समुद्रांतून जहाजासकट बाहेर समुद्र ती- रीं आणून ठेविलें. इकडे महाराजांस उशीर लागला. ह्मणून मंडळी देवालयांत पाहतात तो ते तेथें कोठें दिसेनात. ह्मणून इकडे तिकडे शोधतात तो महाराज ओलेत्यानें आलेले दिसलें- तेव्हां त्यांस मंडळीनीं स्नान करण्याचें कारण सहज विचारलें.. तेव्हां त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हां सवीस मोठें आश्चर्य वाटलें आणि त्यांपैकी एकानें त्यांचें वस्त्र पिळून पा- णी चाखलें तों तें अगदी खारट लागले त्यावरून सर्वांचीच खात्री होऊन त्यांनीं श्रीचिंतामणि महाराजांचा जयजयकार केला नंतर श्रीस नैवद्य होऊन रीतीप्रमाणे ब्राह्मणभोजन झालें त्या श्रीमान् भक्तानें श्रींस मुगुट जवारि वगैरे अर्पण केलें. ७ एके समयीं पुण्यतिथीच्या दिवशीं ऐन दोनप्रहरीं श्रीमहा- विष्णु आणि श्रीशंकर हे फकीर वेषानें श्रीचिंतामणमहाराजां- चे द्वारी आले व त्यांनी सवाल करून भोजन मागितलें. महा- राजांनीं अंतरज्ञानानें ते देव आहेत व आपली परीक्षा पाहण्या- करितां फकीरवेषानें आले आहेत असें जाणिलें. व त्यांना तत्काळ सिद्ध असलेले अन्न अर्पण करून भोजन दिलें हें पाहू- --