पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५८) हास फारच आश्चर्य वाटून तो त्यांचे चरणी लीन झाला महा- राजांनी त्यास प्रसाद देऊन बोळविलें. व ५ त्याच किल्लेदाराच्या स्त्रीला पोटदुखीची नेहमींचीच व्यथा होती. तिची भक्ति श्रीचिंतामणि महाराजांच्या चरणीं जडली व तिनें एकवेळ महाराजांचे दर्शन घेण्याची आपली इच्छा आपल्या पतीस दर्शविली त्यावरून किल्लेदार तिला घेऊन चिंचवड येथे श्रीचिंतामणि महाराजांचे दर्शनास आला. दर्शन झाल्यावर त्यानें आपल्या कुटुंबाची सविस्तर हकीगत महारा- जांचे पुढे सादर केली. त्यावरून महाराजांनी पूर्णकृपेनें तिचे- कडे अवलोकन केलें व तिला तीर्थ व प्रसाद ( शाक-भाजी ) देऊन निरोगी केलें. तेव्हां तीं दोघें आनंदित मनाने परत चाकणास गेलीं व तेथून किल्लेदारांनी श्रीचिंतामणींच्या नांवा- च्या सनदा लिहून पाठविल्या परंतु महाराजांनी त्यांचा स्वीका- र न करितां त्या तशाच परत किल्लेदाराकडे पाठविल्या सनदा परत आलेल्या पाहून किल्लेदारास व त्याच्या कुटुंबास फार वाईट वाटले व त्यांनी कांहीं ब्राह्मणांच्या मध्यस्तीनें श्रीचिंता मणींचे ज्येष्ठ पुत्र श्रीनारायणमहाराज यांजकडून त्यांच्या पश्चात् युक्तीनें वचन घेऊन त्यांचा स्वीकार करविला. असो. ६ एकेवेळी मार्गशीर्ष कृष्णपक्षीं पुण्यतिथिचे दिवशी श्री- चिंतामणि महाराज नैवेद्य समर्पण करण्याकरितां देवालयांत