पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५७) राजाँस ताबडतोब धरून आणण्यासाठी पाठविले. त्यांची स्थिति पूर्ववत् शिपायाप्रमाणें होऊन त्यास भुरळ पडून महा- राजांस धरून नेण्याचा विसर पडला. शेवटीं स्वतः बादशहा फौजेनिशिं यावयास निघाले. हे वृत्त चिंचवडकर मंडळीस समजतांच त्यांनी महाराजांस पळून जाण्याविषयीं विनंतिं केली परंतु श्री चिंतामणीनीं त्यांचें बिलकूल न ऐकतां ते मंगलमूर्तीच्या भजनांत अधिकच रंगून गेले व माझा वाली श्रीमोरया आहे. मला कोणाचेंही भय नाहीं तुह्मी घाबरूं नका असे त्यांनी मंडळीस आश्वासन दिलें. बादशाहा गांवांत येऊन ससैन्य दाखल झाला व महाराजांकडे जाऊन त्यांस धरण्याविषयीं हुकूप करणार तोच एकाएकी त्याची क्रोध- वृत्ति मावळून महाराजांचें दर्शन घ्यावें असें त्यांस वाटलें व तो तत्काळ त्यांचेकडे आला. श्रीचिंतामणीची विभूति पाहिल्या- बरोबरच हा कोणी हिंदूचा खरा अवलिया आहे अशी त्या- च्या मनाची पक्की खात्री झाली. तथापि त्यांची कसोटी पा- हावी एतदर्थ त्यानें एका रुप्याच्या ताटांत मद्य व मांस घालून तें झांकून आणविलें व तुझ्या देवास हैं अर्पण कर ह्मणून तो त्यांस ह्मणाला. श्रीनें तें तत्काळ जाणून त्यावर तीर्थसिंचन केलें व उघडून पाहण्यास सांगितलें तोंच त्याचें दूध व गुला- बाची फुलें असें रूपांतर झालें हा चमत्कार पाहून बादशा-