पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५४) । वरील उच्चतत्याची पूर्णपणें जाणीव होती. त्यांना पुत्र- संततीचें सुख परमेश्वरीकृपेनें उत्तम लाधलें. हें तरी केवळ त्यांचे भाग्यच होय. उत्तमक्षेत्रांत चांगलें बीज पेरलें गेलें तर त्याचें फळ उत्तमच. प्राप्त होणार हें तत्व अगदी त्रिकाला. बाधीत आहे. व याची साक्ष वरील श्रीतुकोबारायाच्या उक्तींत ही स्पष्टपणें निर्दिष्ट केलेली दिसून येते तशीच ऋग्वेदांतील अरणांत आत्मषट्कांत ही याचा उल्लेख उत्तम केलेला आहे "व रमेको गुणी पुत्रो नच मूर्खशतान्यपि | एकश्चंद्रस्तमो हंती नच तारागणा अपि " हजारों तारागणांनीं जो अंधकार नाहींसा होत नाहीं तो फक्त एका चंद्रोदयानें होतो. एकच पुत्र परंतु सद्गुणी व सदाचारी असला तर तें कूळ जसें शोभतें तसें शंभर मूर्खपु- त्रांनींही सुशोभित होत नाहीं. " एकेनापि सुवृक्षेण पुष्पिते मुगंधिना || वासितं तद्वनं सर्व सुपुत्रेण कुलं यथा ॥ " असो श्रीमोरयांनाही तसेंच पुत्ररत्न लाभलें होतें. श्रीचिंतामणिमहाराज यांची कीर्ति आपल्या पित्यापेक्षांही कांकणभर सरस अशी चोहोंकडे पसरून राहिली होती. किंबहुना गतानुगतिक काल त्यांच्या जन्मानें उज्ज्वलितच होत गेला. त्यांनी केलेल्या अद्भुत चमत्कारामुळे त्यांच्या दैवीतेजाची प्रभा पुढें पसरतच गेली. त्यांची वृत्तीही बालपणापासून ईश्वरसेवा आणि अध्या- त्मिक ज्ञान आकडेच वळलेली होती, त्यांनी आपला आयुष्य-