पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५३ ) करून देवालयाबाहेर आली तोंच वैश्यानें त्यांचे पाय घट्ट धरिले आणि घडलेला वृत्तांत त्यांस निवेदन केला. नंतर मो यांनीं सदयअंतःकरणानें त्या मुलाकडे पाहून त्याचे मुखांत तीर्थ घातलें व अंगावरही सिंचन केले. त्यासरसें मूल झोंपें- नून उठल्याप्रमाणे जागे होऊन टकमका पाहू लागलें. हा चमत्कार पाहतांच त्या उभयतांस जो आनंद झाला तो काय सांगावा ? तो वाचकांनी कल्पनेनेंच जाणावा असो. हा अत्य- द्भुत चमत्कार सर्वांनी पाहिल्यावर त्यांनी श्रीमोरयांच्या नांवा. चा सर्वत्र जयजयकार केला. " मंगलमूर्ति मोरया " प्रकरण १३ वें. श्रीमोरयांचा परिवार. १ श्रीचिंतामणि महाराज. "शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटीं " ( श्रीतुकाराम ) ay १ आपल्या ह्या आर्यधमांत कौटुंबिकस्थितीचें पर्यवसान पुत्र- धर्मात झालेले असतें असें आढळून येईल. आणि येवढ्याक रितांच गृहस्थाश्रमाचें महत्व फार मानलें गेलें आहे आणि त्यांतलें त्यांतही सद्धर्मशील व धर्मैकनिष्ठ पुत्रसंतति प्राप्त होणे मोठ्या भाग्याचेंच लक्षण होय. श्रीमोरयांनी गृहस्थाश्रम स्वीकारला तो ईशाज्ञेनें स्वीकारला तर खराच परंतु त्यांस