पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५५) क्रम थोडासा लौकिकदृष्ट्या व्यवहार्य असाच रेखाटला होता. त्यांनी आपल्या वयाच्या आठव्याचवर्षी भाद्रपद शुद्ध ४ चे दिवशीं- ते व्याधिग्रस्त झाले असतांना-मातेजवळ अन्नमागि- तलें परंतु मातुश्रीनें- तो दिवस उपवासाचा असल्यामुळे त्यांस दिलें नाहीं. हें पाहून श्रीचिंतामणीनीं श्रीमोरेश्वराचा धांवा केला. तेव्हां मोरगांवाहून श्रीमंगलमूर्ती आपल्या पत्न्यासह गोसाव्या- च्या रूपानें येऊन त्यांनी त्यांची मनकामना पूर्ण केली. श्री चिंतामणी महाराजांची लहानपणीच कीर्ति सर्वत्र पसरली. २ एकेदिवशीं तळेगांव येथील एका ब्राह्मणानें भक्तिभावानें श्री चिंतामणीच्या चरणीं येऊन विनंति केली कीं, महाराज मी निपुत्रिक असल्यानें फार कष्टी आहें. माझी मनकामना आपल्या कृपाप्रसादानें परिपूर्ण होईल अशी मला दृढ आशा आहे. त्याचा भाव जाणून महाराजांनी त्याला एक आम्र- फल दिलें व तें तूं आपल्या कुटुंबाकडून भक्षण करीव ह्मणून सांगितलें ब्राह्मणानें त्याप्रमाणें करितांच त्याला यथाकालीं पुत्रसंतति प्राप्त झाली. पुढें तो मुलगा श्रीचिंतामणिमहारा- जांच्या सेवेला नेहमीं तत्पर राहिला. उत्तरोत्तर महाराजांची दैविक चमत्कार करून दाखवि ण्याची प्रसिद्धि फारच झाली. ३ एका गंवजेकर ब्राह्मणास मुसलमान सरदारानें "सरकार - .