पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५२ ) बसले. त्यांचे स्मरणार्थ त्या झाडाखाली हल्ली देवळाच्या प श्चिमेस एक गणेशमूर्ति आहे. याचवेळी श्रीमंगलमूर्तींनी श्री ) मोरयांची वृद्धावस्था जाणून त्यांस पुन्हां वारीस न येण्याची आज्ञा केली व आपण स्वतः प्रसादरूपानें त्यांचे गृहीं चिं- चवड येथें राहिले. चमत्कार १३ वा. वैश्याच्या मृतपुत्रास उठविलें. श्रीमंगलमूर्ति मोरयांच्या भक्तीस्तव देवळाबाहेर आले व त्यांचेबरोबर प्रसादरूपानें चिंचवडास गेलें हें वृत्त कर्णोप- कर्णी सर्वत्र पसरलें. लोकांच्या झुंडीच्या झंडी श्रीमोरयांच्या दर्शनास येऊं लागल्या मोरगांवीं दुसरे दिवसीं एकच गर्दी, उडून राहिली. शांतपणानें कोणास दर्शन होण्याचीही पंचा- ईत पडली. अशा समारंभाच्या वेळी एक वैश्यजातीचा धर्म- भोळा मनुष्य आपल्या बायकोमुलासह श्रीमोरयांच्या दर्श- नास आला. गर्दीमुळे त्यास दर्शन होईना शेवटी तसाच नेटा- नें तो गर्दीत शिरत असतां दुर्दैवानें कोणा मनुष्याचा धक्का बसून त्याचे कुटुंबाच्या कडेवरील तान्हा मुलगा खाली पडला. क अणांत चेंगरून जाऊन गत प्राण झाला. मग त्या उभयतांच्या शोकास काय विचारावयाचें आहे ? दुःखातिरेकानें त्याच्या कुटुंबास मूर्च्छा आली. इतक्यांत श्रीमोरयांची स्वारी पूजा