पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५१ ) मोरयांच्या पुढे बसली आहे व मोरया भजनरंगांत अगर्दी तल्लीन झाले आहेत असें दिसलें. हा चमत्कार त्यानें स्वतः पाहून मोठ्या तातडीनें ग्रामस्थांस बोलावून आणून सांगितला. तेव्हां वे आश्चर्यानें श्रीमोरयांकडे पाहू लागले. व हा प्रत्यक्ष ईश्वर रूपानें अवतरला आहे अशी त्यांची खात्री झाली. त्या जानें त्याची प्रार्थना केली कीं, महाराज "आमचा देव श्रीमंगलमूर्ती जागचे जागीं नेऊन बसवा नाहीं तर या स्थलाचें लोकांस वैय्यर्थ वाटेल. सेनानी वाचून सेना- . किंवा चंद्रावाचून रजनी तद्वत् हा आमचा भक्तवृंद श्रीमंगळमूर्तीवाचून व्यर्थ होय. आह्मी आजपर्यंत अति- नम्रतेनें ज्या पायावर मस्तकें ठेविली व जो सर्व सुखाचे आगर असा हा मंगलमूर्ती त्याचें ध्यान पहात आलों. ज्याच्या दर्शनमात्रेंकरून लाखों प्राणि जीवन्मुक्त झाले त्या श्रीमोरे- श्वराचीमूर्ती परत देवळांत नेऊन बसवावी. फार काय सांगावें. आमचा उदरनिर्वाह सुद्धां ही मूर्ती येथें आहे ह्मणूनच यथा- स्थित चालतो. " हे भाषण श्रवण करून श्रीमोरया हांसून ह्मणाले तुम्ही भिऊं नका. शांत चित्त व्हा. माझें भजन संप- ल्यावर श्रीगजानन आपल्या जागीं परत जातील. तुमच्या सर्वांच्या कृपाप्रसादाने मलाही श्रींचीं पाउलें दिसलीं आहेत. आतां तूं सर्व मंडळीसह निर्भय मनानें स्वगृहीं गमन करावें. ओोरयांचें भजन संपताच श्रीगणेश आपल्या जागेवर जाऊन