पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५०) था आज आपल्या हस्तस्पर्शानें निरसन झाली. माझे मागें प्रपंचपाश वगैरे कांहीं नाहीं तेव्हां मला या आपल्या चरणा- चा अंतर पहूं देऊं नये. येवढी माझी नम्रतापूर्वक विनंति आहे. त्यावर "तूं गणेशभजन कर व तुझी इच्छा असल्यास येथेंच प्रतीमासी भेट घेत जा" असें सांगून ते पुढे निघून गेले. चमत्कार १२ वा. मोरयाकरितां श्री मोरेश्वर देवळाबाहेर आले. श्रीमोरयागोसावी एके चतुर्थीस मोरगांवीं वारीस येत अ- सतां त्यांस तेथें पोंचण्यास बरीच रात्र झाली. तेव्हां आतां श्री- मोरयांची स्वारी येत नाहीं असें जाणून पूजाप्पांनी देवद्वारास कुलुपें लाविली इतक्यांत मोरया येऊन पोंचले तों द्वारास कु- लुपें लागल्याचें त्यांस दिसून आले. आपल्या वृद्धावस्थेमुळें आज लोकर येणें न झाल्यामुळे श्रींची पूजा नैवद्य अंतरला है पाहून त्यांस फारच वाईट वाटलें. व त्यांनी देवळाबाहेर त र्टीच्या झाडा ( कल्पवृक्षा) खालीं आसन टाकून ध्यान क रण्यास सुरुवात केली तों श्रीमंगलमूर्ती देवळांतून निघून मो- रयाचे पुढे येऊन बसले. हे पाहून श्रीमोरयांनी सनदीत अंतःकरणानें त्यांचं पूजन स्तवन करून भजनास प्रारंभ केला. त्या गडबडीनें पुजारी जागे झाले आणि त्यांतील एका भा- विक पूजायास देवाची स्वारी देवालयांत सिंहासनावर नसून