पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४९) व थोडें उदक अंगावरही सिंचन केलें. त्यामुळे त्याची तहान भागून देहहि दिव्य झाला. सर्व व्याधि क्षणाधीत नष्ट झाल्या- मुळे त्यांनी श्रीमोरयांची अनन्यभावें स्तुति केली व मला . आपल्या चरणांची कांहीं सेवा घडावी अशी इच्छा दाखविली. त्यावरून श्रीमोरयांनी त्यास श्रीमयुरेश्वराचा नामोच्चार करीत जा. व प्रतिमासी चतुर्थीस मोरगांवीं वारीस येत जा. अशी आज्ञा केली व आपण पुढे निघून गेले. श्रीमोरयासारखा महाभक्त त्या ब्राह्मणास धन्वंतरी मिळाल्यावर त्याची व्याधी नष्ट व्हावी हे अगदीं साहजिक आहे. चमत्कार ११ वा. ब्राह्मणाची पोटशूळ व्यथा घालविली. श्रीमोरया गोसावी एके दिवशीं वारीस गेले असता एका वृक्षाखाली एक ब्राह्मण पोटशूळाचे व्यथेनें फार व्याकुळ हो- ऊन मूच्छित पडलेला त्यांनी पाहिला. तो व्यथेनें जर्जर हो - ऊन परमेश्वराचा धांवा करीत मोठ्यानें आक्रोश करीत होता त्याचे ते करुणालाप ऐकून श्रीमोरयांचें चित्त फारच द्रवलें आणि त्यांनी आपल्या हातानें त्याचें पोट चोळलें. चमत्कार असा झाला की, त्याचें पोट दुखणें क्षणार्धात कमी पडून तो चांगला बरा झाला. नंतर त्यानें उठून श्रीमोरयांस आभार- पूर्वक नमस्कार केला व ह्मणाला; महाराज माझी जन्माची व्य ४