पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४६ ) चमत्कार ७ वा. अन्नपूर्तता केली. श्रीमोरयांच्या लग्नसमारंभ समयीं त्यांच्या श्वशुरानें आपल्या सामर्थ्यानुरूप शंभर सवारों पानांचें साहित्य चिंचवड येथें बरो- ळंबर आणिलें होतें. परंतु तेथें आल्यावर त्यास असें वाटलें कीं, आपण आणिलेल्या भोजनाच्या साहित्यांत लग्नसमारंभा करितां जमलेल्या मंडळींचा समावेश होणार नाहीं ह्मणून त्यास फार काळजी उत्पन्न झाली. हें श्रीमोरयास समजतांच त्यांनीं त्यांस बोलावून आणून सांगितलें कीं, तुझास काळजी करण्याचें बिलकूल कारण नाहीं. श्रीमंगलमूर्ती असलेल्या साहित्यांत • सर्व पार पाडतील. तुह्मी स्वयंपाक सिद्ध झाल्यावर मला कळवा. त्याप्रमाणे त्यांच्या सासऱ्यानें स्वयंपाक सिद्ध झाल्याचें येऊन सांगितलें. नंतर श्रीमोरयांनी स्वहस्तें श्रीमंगलमूर्तीस नैवेद्य समर्पण करून स्वयंपाकगृहांत येऊन सर्व स्वयंपाक अवलोकन केला व त्यावर तीर्थ सिंचन करून पात्रें मांडण्यास आज्ञा दिली. थोडक्याच वेळांत ब्राह्मणांच्या शेंकडो पंक्ति जेवून उठल्या नंतर त्यांनी इतर जातीस प्रसाद वाटला ( आणि स्वयंपाक- घरांत जाऊन पाहतात तों पूर्वसिद्ध अन्न जशाचें तसंच कायम आहे. ) मग सर्वांनी उर्वरित प्रसाद भक्षण करून श्रीमंगलमू- "तच्या नांवाचा जय घोष केला.