पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४७ ) चमत्कार ८ वा. महापुराचें उल्लंघन केलें. एकेवेळी पर्जन्य काळांत श्रीमोरयागोसावी नित्याप्रमाणें मो- रगांवीं वारीस चालले असतां वाटेंत अंबी गांवाजवळ येऊन पोहोंचले तो कन्हानदीला महापूर आला असें त्यांनी पाहिलें. रात्र अंधारी मोरगांवीं तर वेळेवर गेलेंच पाहिजे, तेव्हां आतां काय करावें या चिंतेत ते पडले. शेवटीं कृतनिश्चय करून त्यांनी श्रीमंगलमूर्तीच्या नांवाचा गजर केला व पाण्यांत शिरले तों त्यांस कोणी उतरून पलीकडे नेत असल्याचा भास झाला नदी उतरून पार झाले तो त्यास मांड्या इतकें पाणी लागले असून ज्यानें हात धरला होता तो कोठें दिसेना. तेव्हां श्रीमंगलमूर्ती- नींच आपल्यास साह्य केलें असें जाणून ते त्या आनंदीत झपाट्यानें निघून मोरगांवीं आले. चमत्कार ९ वा. देवद्वाराचीं कुलुपें गळून पडलीं. वर लिहिल्याप्रमाणें मोरगांवीं श्रीमोरयागोसावी दाखल झाले तों बरीच रात्र झाल्याकारणानें पूजाप्पांनी देवालयास कुलुपें लावून ते घरोघर गेले. आता आपली पूजा अंतरली ह्मणून श्रीमोरयांच्या चित्तास फारच उद्विग्रता वाटली तोंच अद्भुत