पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४५ ) चमत्कार ६ वा. अपकाऱ्यावरही उपकारच केला. एकेदिवशीं मध्यरात्रीच्या सुमारास सुरुळगांवीं राहणाऱ्या नरहरी महिपती या नांवाच्या मराठ्यानें श्रीमोरयांची ध्यानस्थ वृत्ति खरी आहे किंवा खोटी आहे हे पाहण्याकरितां मुद्दाम दुष्टपणानें ते ध्यानस्थ असतां त्यांच्यापर्णकुटिकेस एकाएकी आग लाविली. सर्व पर्णकुटिका जळून खाक झाली. परंतु सद्गुरु मोरया आपल्या जागेवरून लवलेश हालले नाहींत.. अग्नीनें त्यांच्या शरीरास बिलकूल इजा केली नाहीं. समाधी विसर्जन केल्यावर त्यांना असे कळून आले की, हैं सर्व कृत्य नरहरीनें परीक्षा पाहण्याकरितां मुद्दामच केलें होतें. तथापि ह्या कृत्याचा त्यास पश्चात्ताप झाल्यावर तो त्यांस शरण आला. तेव्हां श्रीमोरयांनी त्यास क्षमा करून असा पुन्हा कोणाचा व्यर्थ छल न करण्याविषयीं उपदेश केला. अशा प्रकारची ज्याची एकतान वृत्ती झाली त्याला पीडा करणारा ह्या आ खिल ब्रह्मांडांत कोण समर्थ आहे ? अशा त्या विकाररहित पुरुषाला कोणापासून भय आहे ? भयसारें द्वैतपणांत असतें, जे दुज्याभावास गिळून बसले ते जगांत निर्भयच होत. "