पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) रख्या पुण्यपावन सत्पुरुषांकडून झाली. किंबहुना ज्या देशांत असल्या प्रखर धर्मतेजाची प्रभा चोहोंकडे फांकून राहते तो देश सस्यशाली असतो असे झाटले असतां चालेल. आमच्या ह्या आर्यभूमीचें नांव घेतले की, त्याबरोबरच मनांत धर्म मूर्तिमंत उभा राहतो. याचें कारण उघडच आहे की, तिचें आणि धर्माचे अगदी तसँच एकत्व झालेले आहे. पूर्वी साधुपुरुषांच्या पुण्याईनें देशांची हल्ली सारखी निकृष्ट स्थितीच नव्हती. पोटभर खावयाला असल्यावर देशांत शांतता व समाधान असणे साहजिकच आहे. २ आमच्या ह्या महाराष्ट्रांत कांही काळपर्यंत मुसलमानी धर्माची धामधूम चालू होती. सामान्य जनांस ह्या धामधूमींचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसल्याने त्यावेळी देशाची फार दुर्धर अवस्था झाली. या पुण्यभूमीत प्रत्यक्ष परमेश्वर हजारों वेळां अवतरलेला आहे. आणि अनेक वेळां दिलेल्या वचनाप्रमाणें तो धर्म संस्थापना र्थच वरचेवर अवतरत असतो. ही गोष्ट लक्षांत घेतां त्याने अवतार स्थितीत केलेल्या उपदेशाप्रमाणे चालणें हेंच आपणांस श्रेयस्कर आहे. धार्मिक बाबींत साधुसंतावर जयकरितां येईल हें संभवनीय मानणे ह्मणजे सूर्याला तम समजणे किंवा आकाश चर्माप्रमाणें गुंडाळतां येईल असे मानणे यासारखेंच हास्यास्पद होय. धार्मिक दृप्रथा जरी आपले महत्व पृथ्वीवर कमी होण्याची भीति नसली, तथापि संपत्ति व वैभव इत्यादि ऐहिक बाबतीत आपण व अगदी विपरीत स्थितीत आहोत. करितां सत्पुरुषाचा चरित्ररूप आदर्श पुढे ठेवून ऐहिक आणि पारलौकिक सुख आपण संपादावें है अगदी उचित होय. ३ सत्संगप्रीति हैं एक खन्या धार्मिकतेचें मुख्य लक्षण आहे. नि- दर्दोष वर्तन आणि जगत् कल्याणपरायणता हीं संतलक्षणें होत. संत- जन धर्माचे आधारस्तंभच आहेत. अंतःशांतीच्या उत्कृष्ट सुखाचा