पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) अखंड अनुभव घेणारे जे माहात्मे त्यांचा जन्म व जीवितक्रम केवळ लोकहितार्थच ईश्वरेच्छेने होत असतो. प्रत्यक्ष संतसमागम दुर्मिळ असला तथापि संतचरित्रे तरी वाचावीत. संतांच्या समागमानें किंवा संतचरित्रे मननाने आपल्यामध्ये कोणते गुण कमी आहेत हैं कळते व विगुणता दूर करण्याचे उपायही अवगत होतात. इतर जनांच्या समागमापेक्षां संत समागमांत विशेष हा असतो कीं, संत- समागमापासून कधीही वाईट वळण लागण्याची भीति नसते. सं तांचें प्रेम निरपेक्ष व निर्मळ असते म्हणून सर्व धर्मशास्त्र ग्रंथांत संतांचे माहात्म्य फार वर्णिले आहे. मनुष्य जातीला साधु वर्ग हा उत्तम मातापितरांप्रमाणे उपकारी आहे अशा ह्या संतमालिकेपैकी चिंचवडचे श्रीमोरयागोसावी हे एक होत. ज्या ज्या साधनांच्या आधारानें. हा ग्रंथ लिहिला आहे त्यांतील मुख्य साधनांची नांवें. १ मोरयांचें संस्कृत श्लोकबद्ध चरित्र ( हस्त लिखित ) २ मोरयांचें प्राकृत ओवीबद्धचरित्र ( छापील ) ३ चिंचवड माहात्म्य संस्कृत श्लोक ( हस्त लिखित) ४ गणेशभक्तकथा ( हस्त लिखित) ५ मोरयांचें मराठी गद्यचरित्र इसलामपूरकर कृत ( छा० ) } छापील. ६ मुद्गल पुराण. ७ गणेश पुराण, चिंतामणिगोसावीचरित्र ९ १० भक्तिविजय ११ मोरयांचा गाथा. १२ चिंचवड संस्थानांतील जुने कागदपत्र: ( इ. लि. ) (छापील ) ( हस्त लिखित व छापील