पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीगणेशाय नमः उपोद्घात. " “ धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ( श्रीमद्भगवद्गीता ) १ मनुष्य लोकांत धर्माचें बंधन दृढतर रहावें एवढ्या करितां परमेश्वरानें अनेक विभूति मागें उत्पन्न केल्या आणि पुढेही तो करील यांत संशय नाहीं. पशुसृष्टि आणि मानवसृष्टि या दोहोंत जर कांहीं विशेष असेल तर तो 'धर्म' या बाबतीत होय-धार्मिक- कक्षेच्या मर्यादेत राहून मनुष्य प्राण्याला आपल्या जन्माचें साफल्य करितां येतें तशी पशुवर्गाची गोष्ट नाहीं. " चांगले आणि वाईट " यांची निवड करण्याला धर्मासारखें दूसरे साधन नाही. धर्म हा मनुष्य जातीचा आधारच होय. ह्यासाठी अनेकांनी आ किंबहुना पले प्राण संकटांत घातले आहेत धर्मासाठी ख्रिस्ति धर्मसंस्थापक येशूने आपल्या स्वतांस क्रूसावर टांगून घेतलें. साक्रेटिसाने विष प्राशन केलें, मार्टीन लूथरने आपला देह जाळून घेतला. या सर्व गोष्टींचे मूळ त्या पुरुषांच्या धर्मश्रद्धेतच होते. इतर धर्मी यांत जर धर्मासाठी असली माणसें निर्माण झाली आहेत तर आ पल्या ह्या सनातन धर्मात किती सत्पुरुष आणि विभूति उत्पन्न झाल्या असतील ह्याची केवळ कल्पनाच करावी. त्यांत प्रमुखत्वानें गणना करावयाची झणजे बौद्धमत खंडन करून ह्या भरतभूमीत धार्मिक साम्राज्य पुन्हां ज्यांनी प्रस्थापित केले ते श्रीमच्छंकराचार्य हे होत. त्यांची ती चादीमतखंडनाची हतोटी, त्यांचे दिव्यतेज, अतिविशाल बुद्धिसामर्थ्य आणि असामान्य विद्वत्ता हीं कोणाच्या मनांत धर्मज्योत उत्पन्न करणार नाहीत ? खरोखर अशा वंदनीय माहात्म्याकडे पाहून श्रीमद्भगवद्गीतेत शिरोभागी प्रथित केलेली पर- मात्म्याची प्रतिक्षा किति उदात्त, सत्य व संस्मरणीय आहे याची साक्ष पटते जशी धर्माची तशीच देशाची भरभराट ही त्यांच्या सा- ★