पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४४) चमत्कार ५ वा. पवार स्त्रियेस पुत्रप्राप्ति झाली. ताथवडे गांवचा तुकाराम पवार नांवाचा दुसरा एक मराठा गृहस्थ श्रीमोरयांच्या अनुष्ठानस्थलाजवळच राहत होता. तो एकेदिवशीं श्रीचेदर्शनास आला व प्रार्थनाकरून ह्मणाला कीं, महाराज मला आपली कांहीं सेवा घडावी ह्मणून मी श्रीमंगल- मूर्तीच्या नैवेद्याकरितां दूध आणून देत जाईन त्याचा स्वीकार व्हावा. ही त्याची विनंति श्रीमोरयांनी मान्य केली. त्या पवा- राचा दूध देण्याचा नित्य क्रम चालला असता एके दिवशीं त्याचे बायकोस दूध पोंचविण्याचा विसर पडला. सायंकाळी स्मृति होतांच ती दूध घेऊन पर्णकुटिकेंत आली त्यावेळी मोर- यांनी तिला सहज विचारलें कीं, तुला पुत्र किती आहेत ? तें ऐकतांच तिला अत्यंत गहिवर येऊन रडें कोसळलें. व ती ह्मणाली महाराज मला मूलबाळ कांहींच नाहीं. श्रीमोरयांनीं तिची ती अवस्था पाहून कळवळून श्रींचा प्रसाद देऊन तुझी मनकामना लौकरच श्रीगजानन पूर्ण करितील असा आशी- र्वाद दिला. पुढ़ें कांही दिवसांनी तिला पुत्र प्राप्ति झाली. त्यावेळी पवाराने त्यास जमीन इनाम दिलेली अद्याप त्यांचे वंशजाकडे उपभोगास आहे.