पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४३) तो श्रीचिंतामणि यांनी त्यांची कसोटी पाहण्याकरितां एक महाक्रूर व्याघ्र त्यांच्या अंगावर सोडला. परंतु श्रीमोरयांच्या समाधिवृत्तीत यत्किचित् चलबिचल झालीं नाहीं. उलट श्री- मोरयांचा अंगस्पर्श त्या व्याघ्रास होतांच तो तात्काळ शिला- रूप झाला. व उद्धरून गेला. ती शिला अद्याप थेऊर येथें का- यम आहे. चमत्कार ४ था. शेतकयाच्या जन्मांध मुलीस दिव्य दृष्टि दिली. एकेदिवशीं श्रीमोरयागोसावी ताथवडे गांवांजवळील किव- जाई देवीच्या देवळांतून अनुष्ठान संपवून श्रींच्याधूपातींसाठी विस्तव आणण्याकरितां जवळ असलेल्या पवाराच्या शेतांतील कोपींत गेले त्यावेळी पवाराचीं मनुष्य रानांत गेलीं होतीं व घरी एक जन्मांध कन्या राहिली होती. तिच्याजवळ श्रीमो- रयांनीं अग्नि मागितला. तेव्हां तिनें मी आंधळी असल्यानें विस्तव देण्यास असमर्थ आहे असे सांगितलें त्यावरून त्या योग्यानें श्रीगजानन कृपेनें तुला दिसूं लागेल तूं विस्तव लौकर आणून दे असें सांगितलें ती विस्तव देण्यास उठतांच तिला दिव्यदृष्टि प्राप्त झाली व तिनें तत्काळ अग्नि आणून श्रीमोरया गोसावी यांस दिला व त्यांचें चरणीं लीन झाली. .